VIDEO: हेसुद्धा नाही सोडलं; सेलिब्रिटी आईचे स्तन झाकू पाहणाऱ्या मुलीला पाहून फॉलोअर्सचा संताप...

Viral: सध्या कलाकारांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, त्या पुन्हा एकदा एका अभिनेत्रीच्या या व्हिडीओनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. 

Updated: Jan 6, 2023, 04:29 PM IST
VIDEO: हेसुद्धा नाही सोडलं; सेलिब्रिटी आईचे स्तन झाकू पाहणाऱ्या मुलीला पाहून फॉलोअर्सचा संताप... title=

Padmalaxmi Trolled: हल्ली कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Celebs Viral Video) जोरात व्हायरल होतात आणि त्यामुळे सगळीकडेच एकच चर्चा सुरू होते ती त्यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओजची. सध्या असाच एक व्हिडीओ सगळीकडे (Celebs Trolled) व्हायरल होत असून तो चर्चेचा विषय ठरतो आहे. या व्हिडीओमुळे सध्या सगळीकडून विविध संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नक्की हा व्हिडिओ आहे तरी काय आणि या व्हिडीओमुळे एका दिग्गज अभिनेत्रीला ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागतो आहे. या व्हिडीओ अभिनेत्री किचनमध्ये काहीतरी शिजवताना दिसते आहे. तोच तिचा व्हिडीओ काढताना तिची मुलगी तिचे व्हिडीओत दिसणारे स्तन लपवण्याचा प्रयत्न करते. त्यावर आपल्या मुलीला ती जे काही सांगते त्यावरून मात्र या अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. परंतु आपल्यावर झालेल्या ट्रेलिंगला या अभिनेत्रीनं अगदी सडेतोड उत्तरही दिले आहे. (Model Padma Lakshmi gets criticized for making daughter feel uncomfortable with her boobs comment)

व्हिडीओमुळे का झाली ट्रोल ही अभिनेत्री? 

व्हिडीओत दिसणाऱ्या अभिनेत्रीचं नावं आहे पद्मलक्ष्मी (Padmalaxmi). ही एक जगप्रसिद्ध मॉडेल आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे अनेक होम मेड व्हिडीओजही पोस्ट करत असते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत ती किचनमध्ये काहीतरी बनवताना दिसते आहे. त्याचबरोबर तिच्या कपड्यांमुळे ती ट्रोल झाली नसून तिच्या मुलीनं तिच्यासोबत गेलेल्या कृतीमुळे ती जास्त ट्रोल झाली. या व्हिडीओत तिचे स्तन (Breast) दिसत असल्याने चक्क तिची मुलगीचं तिचे स्तन लपवण्याचा प्रयत्न करते आणि मग तिची आई गंमतीत तिला म्हणते की, तू माझे स्तन लपवण्याचा का प्रयत्न करते आहेस? विसरू नकोस एकेकाळी तूच माझ्या स्तनातून दूध प्यायले आहेस. परंतु यावरून पद्मलक्ष्मी खूप ट्रोल होते आहे. 

पद्मलक्ष्मीचं सडेतोड उत्तर 

या ट्रोलिंगवर मात्र पद्मलक्ष्मीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. ती म्हणाली की, सर्वप्रथम हा व्हिडीओ गंमतीत शूट करण्यात आला आहे. माझी मुलगी माझ्या स्तनामुळे, माझ्यामुळे किंवा माझ्या पोस्टमुळे अस्वस्थ नाही. एकतर ती सोशल मीडियावर नाही आणि तिला सोशल मीडियाच्या कमेंट्सही वाचता येत नाहीत. असा सडेतोड उत्तरही तिनं दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पद्मलक्ष्मी ही जगप्रसिद्ध फॅशन मॉडेल आहे. तिचा जन्म चेन्नईत झाला आहे. ती मॉडेलसोबत एक अभिनेत्री आणि एक लेखिका पण आहे. त्याचसोबतच ती एक सुत्रसंचालिका देखील आहे. 2017 साली तिनं मॉडेल विश्वात लॅक्मे फॅशन वीकमधून परत कमबॅक केला होता.