नशीब कुठे फळफळेल काही पत्ता नसतो; रस्त्यावर रडणारी अनाथ मुलगी, आज खान कुटुंबाची राजकुमारी

गेल्या काही वर्षांपासून अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा खान कुटुंबातील बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन हिरीरिनं करताना दिसत आहेत.   

Updated: May 4, 2022, 04:34 PM IST
नशीब कुठे फळफळेल काही पत्ता नसतो; रस्त्यावर रडणारी अनाथ मुलगी, आज खान कुटुंबाची राजकुमारी title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वतीनं यंदाच्या वर्षी रमजान ईदच्या पार्टीचं आयोजन त्याची बहिणी अर्पिता खान हिनं केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा खान कुटुंबातील बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन हिरीरिनं करताना दिसत आहेत. (Salman khans sister Arpita khan sharma and ayush sharma hosts eid party)

अर्पिता सलमानच्या बऱ्याच जबाबदाऱ्या लिलया पेलताना दिसत आहे. कला जगतामध्ये जेव्हा जेव्हा खान कुटुंबाचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा अर्पिताचं नावही यामध्ये आवर्जून घेतलं जातं. 

आतापर्यंत सर्वांनाच ठाऊक असावं, पण ज्यांना कल्पनाही नाही त्यांच्यासाठी.... अर्पिता सलमानची सख्खी बहिण नाही. अर्थात तिचं कुटुंबाशी आणि सलमानशी असणारं नातं पाहता अशी शंकाही येत नाही. पण, हेच खरंय. 

सूत्रांच्या माहितीनुसार सलीम खान आणि हेलन यांनी अर्पिताला दत्तक घेतलं होतं. सलीम खान यांनी जेव्हा हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं तेव्हाच त्यांनी मूल दत्तक घेण्याचा विचार केला होता. 

असं म्हटलं जातं की त्यांना रस्त्याच्या कडेला एक बाळ रडताना दिसलं. ते बाळ घरी आणत त्यांनी तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. हेच दत्तक बाळ म्हणजे अर्पिता खान. तिला या कुटुंबात कधीच पोरकेरपणाची वागणूक मिळाली नाही. 

अरबाज, सोहेल आणि सलमान या तिन्ही भावांची अर्पिता लाडकी बहीण. आतापर्यंत अनेकदा त्यांच्या नात्यांचे सुरेख बंधही पाहायला मिळाले आहेत. 

रस्त्यावरून सुरु झालेलं अर्पिताचं आयुष्य खान कुटुंबात येऊन स्थिरावलं. हे पाहताना कोणाचं नशीब कुठे फळफळेल काहीच सांगता येत नाही, यावर अनेकांचाच विश्वास बसला. 

परदेशात पाठवत खान कुटुंबानं अर्पिताला उच्चशिक्षण दिलं. तिनं  (London college of fashion) मधून फॅशन मार्केटिंग आणि मॅनेजमेंट (Fashion Marketing & Management) चं पदवी शिक्षण पूर्ण केलं. तिनं मुंबईतील एका Interior designing firmमध्येही काही काळ काम केलं. 

अर्पिता सलमानसाठीही तितकीच महत्त्वाची. आजच्या घडीला त्याच्या सर्वात जवळच्या व्यक्तींपैकी एक म्हणजे अर्पिता खान. आहे की नाही, खान कुटुंबातील या राजकुरमारीचं आयुष्य हेवा वाटण्याजोगं?