mandira bedi bikini photo: मंदिरा बेदीने खास मित्रासोबत पूलमधला फोटो केला शेअर, लोकांनी यासाठी केलं ट्रोल

अभिनेत्री मंद‍िरा बेदी (Mandira bedi) एका वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चेत

Updated: May 4, 2022, 04:31 PM IST
mandira bedi bikini photo: मंदिरा बेदीने खास मित्रासोबत पूलमधला फोटो केला शेअर, लोकांनी यासाठी केलं ट्रोल title=

Mandira bedi on Bikini : अभिनेत्री मंद‍िरा बेदी (Mandira bedi) पती राज कौशलच्या अचानक मृत्यूने दु:खी होती. तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेहमी चर्चेत असणारी मंदिरा बेदी काही दिवस यापासून लांब होती. पण एका वर्षानंतर मंदिरा बेदीने पुन्हा एकदा आपला फोटो शेअर केला आहे. पण या बिकीनी फोटोमुळे ती ट्रोल ही झालीये.

मंद‍िरा बेदी (Mandira bedi) आपल्य़ा मित्राच्या वाढदिवसासाठी थायलंडला गेली होती. येथे तिने मित्र आद‍ित्य मोटवानी सोबत पूलमधला सेल्फी पोस्ट करत त्याला विश केलं. मंदिरा बेदीने लिहिलं की, 'हॅप्पी बर्थडे आद‍ि. हा फोटो सगळं काही सांगतोय की तु माझ्यासाठी काय आहेस. आपण एकमेकांना कधीपासून ओळखतो. आपलं कनेक्शन काय आहे आणि माझा तुझावर किती विश्वास आहे. तुला अजून प्रेम, आनंद आणि यश मिळूदे. लव्ह यू, 17 वर्षाची असल्यापासून तू माझा खास मित्र आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

अभिनेत्री मंदिरा बेदीने हा फोटो शेअर केला आणि ती ट्रोल झाली. अनेकांनी त्यावर विचित्र कमेंट केले. ज्यानंतर तिने कमेंट सेक्शन बंद केलं. पण या फोटोला अनेकांनी लाईक देखील केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

यानंतर मंद‍िराने आपली सोलो बिकीनी फोटो शेअर केला. मंद‍िरा सध्या तिच्या दोन्ही मुलांना वेळ देते आहे. आपल्या फिटनेसवर ही ती लक्ष देतेय. सकारात्मक पोस्ट देखील ती शेअर करत असते.