Salman Khan ला सतावतेय नवी चिंता; अडचणी काही संपेना

सलमान भलत्याच कारणानं चर्चेत आला आहे. 

Updated: Jan 5, 2022, 12:01 PM IST
Salman Khan ला सतावतेय नवी चिंता; अडचणी काही संपेना  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड कलाकारांवर चाहते जितक्या प्रमाणात प्रेमाचा वर्षाव करतात तितकंच जर हे कलाकार कुठे चुकले तर त्यांना निशाण्यावरही धरण्यास कमी करत नाहीत. एक लहानशी चुकही अशा वेळी कलाकारांना चाहत्यांच्या नजरेतून उतरवण्यात पुरेशी असते. (salman khan)

सध्या अभिनेता (Salman Khan) अशाच परिस्थितीचा सामना करत आहे. एका व्हायरल व्हिडीओमुळे सध्या सलमान भलत्याच कारणानं चर्चेत आला आहे. 

व्हिडीओमध्ये सलमान 'दबंग' या चित्रपटातील 'पांडे जी सिटी' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

आता सलमान आहे तर, चाहत्यांसाठी त्याचं असणंही तितकंच महत्त्वाचं. पण, इथे मात्र त्याचं वाढलेलं वजन, सुटलेलं पोट यावरच अनेकांच्या नजरा खिळल्या.

मग काय, सलमानचा डान्स अफलातून असतानाही त्याला या वाढलेल्या वजनामुळं विचित्र कमेंट्सचा सामना करावा लागला. 

काही नेटकऱ्यांनी सलमान त्याचं सुटलेलं पोट लपवण्यासाठी तरबेज असल्याचं म्हटलं तर काहींनी त्याच्या 'सिक्स पॅक' लूकवर प्रश्न उपस्थित केला. 

अनेकदा सुटलेलं पोट हे लग्न न ठरण्याचं कारणंही असतं. हाच मुद्दा काहींनी सलमानशीही जोडत त्याचं लग्न न होण्यामागे हेच तर कारण नाही, असा प्रश्न केला. 

सलमानच्या व्हायरल व्हिडीओवर होणाऱ्या या कमेंट पाहता त्याचा हा अंदाज, त्याहूनही त्याचं वाढलेलं वजन काही चाहत्यांना पटलेलं नाही हेच खरं.