Ganeshotsav 2020 : ...असा रंगला सलमानच्या घरचा गणेशोत्सव

गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी खुद्द सलमाननचीही उपस्थिती पाहायला मिळाली. 

Updated: Aug 23, 2020, 08:13 AM IST
Ganeshotsav 2020 :  ...असा रंगला सलमानच्या घरचा गणेशोत्सव  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता salman khan सलमान खान याच्या कुटुंबातही दरवर्षी Ganeshotsav गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. संपूर्ण कलाविश्वात खान कुटुंबीयांकडून केल्या जाणाऱ्या बाप्पाच्या साधनेबाबत सर्वांनाच कुतूहल लागून राहिलेलं असतं. अतिशय मनोभावे या सेलिब्रिटी कुटुंबात यंदाही बाप्पांचं आगमन झालं. यावेळी सलमानच्या कुटुंबीयांमध्ये त्याची प्रेयसी लुलिया वंतूर हिचीही उपस्थिती पाहायला मिळाली. 

यंदाच्या वर्षी सलमानचा भाऊ सोहेल खान याच्या घरी गणेशोत्सवाच्या या आनंदपर्वाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी सलमानची बहीण अर्पिता खान हिनं बाप्पांची सुरेख मूर्ती घरात विराजमान केली. या प्रसंगी अलविरा खान, हेलन, सलीम खान आणि इतर कुटुंबीयांची उपस्थिती होती. अभिनेता अरबाज खान यावेळी त्याची प्रेयसी जॉर्जिया आंद्रीयानी हिच्यासमवेत दिसला. तर, अभिनेत्री डेझी शाह हिनंसुद्धा खान कुटुंबीयांसह या उत्सवात सहभाग घेतला. 

गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी खुद्द सलमाननचीही उपस्थिती पाहायला मिळाली. भाईजानची बहीण अर्पिता खान शर्मा हिच्या पतीनं म्हणजे अभिनेता आयुष शर्मा यानं सोशल मीडियावर गणरायाची सुशोभित मखरात विराजमान मूर्ती सर्वांच्या भेटीला आणली. यावेळी त्याची मुलगी आणि मुलगा बाप्पापुढं बसून त्याचे आशीर्वाद घेताना दिसले. 

 
 
 
 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma) on

 

 

गेल्या काही काळापासून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान सलमान आणि त्याच्या कुटुंबातील बरेच सदस्य हे पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसवर वास्तव्यास होते. ज्यानंतर आता गणेशोत्सवाच्या निमित्तानं खान कुटुंबीय एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. गणरायाच्या आगमनानं सध्या सर्वत्र आनंदाचं आणि तितकंच सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. खान कुटुंबाकडे पाहतानाही याचीच प्रचिती आली.