तिचा सहवास म्हणजे स्वर्ग.... सलमानकडून खास नात्याचा हळुवार उलगडा

सलमाननं कायमच त्याच्या जीवनात काही व्यक्ती आणि काही नात्यांना अनन्यसाधारण महत्त्वं दिलं आहे. 

Updated: Feb 9, 2022, 10:35 AM IST
तिचा सहवास म्हणजे स्वर्ग.... सलमानकडून खास नात्याचा हळुवार उलगडा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता सलमान खान याला हिंदी कलाजगतामध्ये यारों का यार म्हणून ओळखलं जातं. नवोदितांच्या मदतीला येणारा, गरजवंतांना सढळ हस्ते मदत करणारा, मित्रांना खळखळून हसवणारा सलमान कायमच हवाहवासा वाटतो. अशा परिस्थितीतच तो कुटुंबाला आणि काही खास व्यक्तींनाही प्राधान्य देताना दिसतो. (Salman khan)

सलमाननं कायमच त्याच्या जीवनात काही व्यक्ती आणि काही नात्यांना अनन्यसाधारण महत्त्वं दिलं आहे. 

रुपेरी पडद्यावर दमदार कामगिरी करणारा हा अभिनेता काही व्यक्तींसमोर मात्र तितकाच हळवा आणि भावनिक असल्याचं पाहायला मिळालं आहे. 

सतत ज्याच्या लग्नाची, रिलेशनशिपची चर्चा सुरु असता असा हा सलमान आता एका खास व्यक्तीसोबत समोर आला आहे. 

ही व्यक्ती त्याच्यासाठी कैक वर्षांपासून अतिशय महत्त्वाची आहे. खरंतर त्याच्या जन्मापासूनच या व्यक्तीनं सलमानला पाहिलंय. ती म्हणजे त्याची आई. 

सलमाननं नुकताच त्याच्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. इथे तो आईच्या मांडीवर डोकं ठेवून निवांत क्षणांचा आस्वाद घेताना दिसत आहे. 

जगात कितीही गोंधळ असो, आयुष्यात कितीही उलथापालथ असो, आईच्या छायेत आल्यावर सगळ्या गोष्टी मागे पडतात. हेच सलमाननं त्याच्या पोस्टच्या माध्यमातून दाखवून दिलं. 

आईचा सहवास, तिच्या मांडीवर डोकं ठेवणं म्हणजेच स्वर्ग, असं कॅप्शन त्याने पोस्ट शेअर करताना लिहिलं. 

बघता बघता त्याची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आणि अर्थातच याची चर्चाही झाली.