मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान, हा त्याच्या दिलदार स्वभावासाठी ओळखला जातो. कलाजगतामध्ये त्याला अनेकजण भाईजान, सल्लू अशाच नावांनी ओळखतात. सलमान ज्यांच्याशी मैत्री करतो, त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकतो असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
फक्त सलमानच मित्रांवर जीव ओवाळतो असं नाही, तर त्याचे मित्रसुद्धा त्याची तितकीच काळजी घेताना दिसतात. असाच एक किस्सा सलमाननं नुकताच शेअर केला.
आयफा 2022 च्या निमित्तानं नुकतीच सलमानसह बऱ्याच सेलिब्रिटींनी परदेशी हजेरी लावली होती. International Indian Film Academy Awards (IIFA Awards) च्या मंचावर यावेळी त्यानं एक आठवण शेअर केली.
जाहीरपणे सलमान रडण्याची ही पहिलीच वेळ असावी. समोर हजारोंचा जनसमुदाय आणि त्यात कलाकारांचीही हजेरी असतानाही सलमान एका अभिनेत्यासोबतची आठवण सांगताना प्रचंड भावूक झाला. (Bollywood Actor Salman Khan gets emotional shares Suniel Shetty gifted him shirt watch video)
एका मोठ्या दुकानात खरेदीसाठी गेलो असता जुन्या दिवसांमध्ये माझ्याकडे तितकेसे पैसे नव्हते, असं म्हणत त्यावेळी फक्त जिन्सच घेतल्याचं सलमाननं सांगितलं. हे सर्व सुनील शेट्टीनं पाहिलं आणि या अभिनेत्यानं आणि त्याने सलमानला आवडलेलं शर्ट विकत घेत त्याला गिफ्ट दिलं असं सलमाननं सांगितलं.
ही आठवण सांगताना सलमानला अश्रू थांबवणंही कठीण झालं. काही क्षण तो शांत झाला. हे पाहताच तिथं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सुनील शेट्टीच्या मुलानं, अहाननं त्याला घट्ट मिठी मारली.
सलमानचा एका पाकिटावरही डोळा होता. पण, पैसे नसल्यामुळं तो हेसुद्धा घेऊ शकला नव्हता. पण, नंतर मात्र सुनील शेट्टीनं त्याला आपल्या घरी बोलवून तेच पाकिट भेट केलं होतं.
सलमान आणि सुनील शेट्टीचं हे मैत्रीचं नातं पाहता, मैत्री अशीच असावी. अव्यक्त तरीही घट्ट, असंच अनेकांचं मत झालं.