सलमानच्या साथीने सेलिब्रिटींनीही ढोल- ताशांच्या गजरावर धरला ठेका

गणपती विसर्जनाच्या वेळी गणरायाचरणी नतमस्तक होणाऱ्या भाईजानचा अनोखा अंदाज 

Updated: Sep 4, 2019, 09:07 AM IST
सलमानच्या साथीने सेलिब्रिटींनीही ढोल- ताशांच्या गजरावर धरला ठेका  title=
सलमानच्या साथीने सेलिब्रिटींनीही ढोल- ताशांच्या गजरावर धरला ठेका

मुंबई : गणेशोत्सवाचा उत्साह आणि आनंद आथा परमोच्च शिखरावर पोहोचला आहे. सोमवार पासून सुरु झालेल्या या मंगलपर्वात मंगळवारी दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. 'पुढच्या वर्षी लवकर या' असं हक्काने सांगत बाप्पाकडून लवकर परत येण्यातं वचन घेत अनेक भाविकांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. कलाकार मंडळीही यात मागे राहिली नाहीत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांचच लक्ष लागून राहिलेल्या भाईजान सलमान खान याच्याही कुटुंबाची धूम पाहायला मिळाली. 

बहीण अर्पिता खान हिच्या घरी सलमानच्या कुटुंबाचे बाप्पा विराजमान झाले. यावेळी बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींना त्यांच्या दर्शनासाठी हजेरी लावली. ज्यानंतर संपूर्ण विधीवत पूजेसह दीड दिवसांनी या बाप्पांचा विसर्जन करण्यात आलं. 

ढोल ताशांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक काढत त्यांना वाजतगाजत निरोप देण्यात आला. यावेळी सलमान वादकांमध्ये जाऊन त्यांचा उत्साह वाढवताना पाहायला मिळाला. त्यात्या कुटुंबातील गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी बी- टाऊनमधील सेलिब्रिटी मित्रपरिवाराचीही उपस्थिती पाहायला मिळाली. यामध्ये अभिनेत्री स्वरा भास्कर, डेझी शाह, सोनाक्षी सिन्हा, नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांची उपस्थिती पाहायला मिळाली. 

सलमानचा हा अंदाज चाहत्यांसाठी नवीन नव्हता. दरवर्षी कामाच्या आणि आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणातून वेळ काढत हा अभिनेता गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करतो. यंदाही त्याने 'दबंग ३' या चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढत एकच कल्ला केल्याचं पाहायला मिळालं.