मुंबई : दिवाळीचा Diwali 2020 सण म्हटलं की प्रत्येकजण, सानथोर, गरीब- श्रीमंत असा प्रत्येक घटक हा सण आपल्या परिनं साजरा करतो. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा, प्रचंड उर्जा आणि सकारात्मकता आणणारा हा सण. अतिशय उत्साही वातावरणात सुरु झालेल्या या मंगलपर्वाचा आनदं सेलिब्रिटी मंडळीही त्यांच्या अंदाजात घेत आहेत. या साऱ्यामध्ये वेगळेपण जपलं आहे ते म्हणजे अभिनेता रितेश देशमुख यानं.
दिवाळीच्या सणाला नवे कपडे खरेदी करत ते घालण्याला अनेकजण प्राधान्य देतात. Riteish Deshmukh रितेश आणि त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया डिसूजा यांनीही असंच काहीसं केलं. पण, यामध्ये त्यांनी एक सुरेख शक्कल लढवली.
ही शक्कल होती जुन्यातून नवं काहीतरी साकारण्याची. यातलं जुनं म्हणजे आईची एक जुनी, सुंदर अशी साडी आणि नवं म्हणजे मुलांसाठी साकारलेले दिवाळीचे कपडे.
माँ की पुरानी साड़ी, बच्चों के लिए दिवाली के नए कपड़े। Happy Diwali .... shot by Baiko @geneliad - Song credit @sujoy_g #Recycle pic.twitter.com/hfSvLBXdjG
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 14, 2020
सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा देत रितेशनं आपण यंदाच्या वर्षी दिवाळीचं हे मंगल पर्व नेमकं कोणत्या पद्धतीनं साजरा करत आहोत, याबाबतची एक झलक सर्वांनाच एका व्हिडिोच्या माध्यमातून दाखवली. ज्यामध्ये रितेशसह त्याची दोन मुलं सर्वांनाच अभिवादन करताना दिसत आहेत. व्हिडिओ पोस्ट करताना आईच्या जुन्या साडीपासून मुलांसाठी नवे कपडे बनवल्याचं त्यानं सांगितलं. त्याचा हा अनोखा फंडा सोशल मीडियावर अनेकांचीच मनं जिंकून गेला.