VIDEO : इकॉनॉमी क्लासमध्ये आमिर येताच सहप्रवासी थक्क

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

Updated: Apr 23, 2019, 05:04 PM IST
VIDEO : इकॉनॉमी क्लासमध्ये आमिर येताच सहप्रवासी थक्क title=

मुंबई : अभिनेता आमिर खान हा नेहमीच त्याच्या कृतींतून इतरांसाठी आदर्श प्रस्थापित करत असतो. मग ते त्याचे चित्रपट असो किंवा एखादा निर्णय. सध्या हा परफेक्शनिस्ट आमिर त्याच्या अशाच एका कृतीमुळे सर्वांचीच मनं जिंकत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत असल्यानुसार आमिरचा विमान प्रवास त्याच्या चाहत्यांना आणि सहप्रवाशांना आश्चर्याचा धक्काच देऊन गेला. 

सेलिब्रिटी म्हटलं की सहसा ते विमान प्रवास करतेवेळी बिझनेस क्लासलाच प्राधान्य देतात. पण, आमिरने मात्र ही वाट न धरता 'गो एअर' या संस्थेच्या इकॉनॉमी क्लासमधूनच विमान प्रवास केला आहे. अगदी सहजपणे तो आपल्या स्थानावर बसल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. तर, त्याच्यासोबतच असणाऱ्या प्रवाशांना मात्र आमिर त्यांच्यासोबत प्रवास करणार असल्याची बाब काही सहजासहजी पचनी पडत नसल्याचं दिसत आहे. 

 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

कलाविश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या आमिरचा हा अंदाज अनेकांचीच मनं जिंकून गेला असून, त्याला परफेक्शनिस्ट का म्हटलं जातं हेच पुन्हा एकदा सिद्ध करत आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून, त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आमिरवर कौतुकाचा वर्षावही केला आहे. अभिनयासोबतच आमिर अन्य समाजोपयोगी कामांमध्येही हिरीरिने सहभागी होताना दिसत आहे. मग ते श्रमदान असो किंवा पानी फाऊंडेशनच्या कामासाठी जनतेला केलेलं आवाहन असो. हा अभिनेता वेळोवेळी त्याच्या मनाचं मोठेपण दाखवून देतो, हेच खरं.