मुंबई : पंकज त्रिपाठी हा एक असा भारतीय अभिनेता आहे ज्याने बॉलिवूड चित्रपटांमधून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) याचा जन्म गोपाळगंज, बिहारमध्ये झाला आहे. पंकज त्रिपाठी याचे आई-वडील शेतकरी होते. पंकज त्रिपाठी यानी 2004 मध्ये अभिषेक बच्चन आणि भूमिका चावला स्टार फिल्म रन या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली. या चित्रपटात त्याने चोराची भूमिका केली होती. यानंतर त्यांनी बर्याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. आज पंकज त्रिपाठी याचे नाव बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये आहे.
अभिनेता पंकज त्रिपाठी म्हणतो की, "मला पडद्यावर जी व्यक्तिरेखा साकारायची आहे. त्या व्यक्तिरेखेबद्दल मी आधी खात्री करून घेतो की, ती व्यक्तिरेखा प्रेक्षक पसंत करतील का? त्याच बरोबर ती अशी भूमिका असावी जी वास्तववादी आणि विश्वासपात्र असेल."
तो म्हणतो की, मला सगळ्या वयोगटातील व्यक्तिरेखांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्याच बरोबर इतके सक्षम व्हायचे आहे की, एकाच कुटुंबातील तीन वेगवेगळ्या पिढ्यांसह काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. खूप आनंदी आहे की, त्याच्याकडे असे काही प्रोजेक्ट आहेत. ज्याच्या माध्यमातून ते या गोष्टी करु शकतात. यावर्षी पंकज त्रिपाठीचे अनेक चित्रपट रिलीज होणार आहेत, ज्यात 'मीमी आणि मुंबई सागा' या चित्रपटांचा समावेश आहे.