VIDEO : तनुश्रीच्या आरोपांवर नाना म्हणतात, आता जे....

वारंवार विचारले जाणारे तेच प्रश्न पाहता मी....

Updated: Oct 7, 2018, 11:42 AM IST
VIDEO : तनुश्रीच्या आरोपांवर नाना म्हणतात, आता जे.... title=

मुंबई: अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या सेचवर आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचं म्हणत तनुश्री दत्ता हिने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ज्यानंतर दर दिवसाआड या सर्व प्रकरणाला वेगळं वळ  मिळाल्याचं पाहायला मिळालं. 
एकिकडे तनुश्रीने नाना, गणेश आचार्य, सामी सिद्दीकी यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेली असतानाच दुसरीकडे खुद्द नानांनी मात्र तनुश्रीला खोटं ठरवत तिने केलेलं विधान हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं माध्यमांसमोर स्पष्ट केलं.

नाना मुंबईत कधी परतणार हीच अनेकांना प्रतिक्षा लागून राहिलेली असतानाच अखेर ज्यावेळी ते मुंबईत परतले तेव्हा त्यांच्याभोवती माध्यमांनी गराडा घालत याविषयीच प्रश्व विचारण्यास सुरुवात केली.

वारंवार विचारले जाणारे तेच प्रश्न पाहता मी या साऱ्याची उत्तरं आधीच दिली आहेत. जे खोटं आहे ते खोटंच आहे असं म्हणत नानंनी एक मिश्लिल हास्य देत ते थेट कारमध्ये बसल्याचं पाहायला मिळालं. 

एएनआय या वृत्तसंस्थेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलं असून, आता नानांची ही प्रतिक्रियाही चर्चेचा विषय ठरत आहे. 

तनुश्रीने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान, दहा वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगावरुन पडदगा उचलत, सर्वांनाच धक्का दिला होता. ज्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी चित्रपटाच्या सेटवरही काही दिवस अनुपस्थित राहणं पसंत केल्याचं म्हटलं गेलं होतं.