गर्लफ्रेंडसोबत डेटवर गेलेल्या हृतिकचा 'तो' Video Viral

हृतिकनं बऱ्याच वर्षांनी त्याच्या आयुष्यात कोणा खास व्यक्तीला इतकं महत्त्वाचं स्थान दिलं

Updated: Aug 22, 2022, 09:37 AM IST
गर्लफ्रेंडसोबत डेटवर गेलेल्या हृतिकचा 'तो' Video Viral  title=
Bollywood Actor hrithik roshan movie date with girlfriend saba azad

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची प्रेयसी सबा आझाद यांचं नातं कोणापासूनही लपलेलं नाही. वैवाहिक नात्यातून बाहेर पडल्यानंतर हृतिकनं बऱ्याच वर्षांनी त्याच्या आयुष्यात कोणा खास व्यक्तीला इतकं महत्त्वाचं स्थान दिलं. परिणामी हे नातं सर्वांच्याच नजरेत आलं. (Bollywood Actor hrithik roshan movie date with girlfriend saba azad )

तिथे बॉलिवूडच्या ग्रीक गॉडची अर्थात हृतिकची Ex Wife अभिनेता अली गोनी चा भाऊ अर्सलान गोनी याला डेट करत आहे. तर, इथे हृतिकच्या आयुष्यात सबा दिवसागणिक आणखी महत्त्वाचं स्थान मिळवताना दिसत आहे. 

नुकतंच ही जोडी म्हणे मुव्ही डेटला गेली होती. विरल भयानीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या या डेटदरम्यानचे काही क्षण एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले. 

चित्रपट पाहायला गेलं असताही हृतिक (hrithik roshan) आणि सबा (saba azad ) एकमेकांचा हात धरुनच दिसले. सबा मागून चालत येताना हृतिकची नजर तिच्यावरून हटत नव्हती. मोठ्या चपळाईनं त्यानं सबाला कॅमेरांपासून लपवलंसुद्धा. 

एकिकडे ही डेट चर्चेत असतानाच दुसरीकडे काही नेटकऱ्यांचं लक्ष हृतिकच्या वाढत्या वयाकडे आणि पांढऱ्या दाढीकडे गेलं. सर्वात सुंदर अभिनेत्याचं उतारवय आता स्पष्टपणे दिसू लागलं आहे, अशाच आशयाच्या प्रतिक्रिया यानंतर काहीजणांनी देण्यास सुरुवात केली.