मुंबई : अभिषेक चौबेचा 'उडता पंजाब' हा बॉलीवूडमध्ये खूप वादग्रस्त चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्टचा दमदार अभिनय होता. या सिनेमात अभिनेत्रीने स्थलांतरित बिहारी मुलीची भूमिका साकारली होती. आलिया भट्टने अलीकडेच तिला हा चित्रपट कसा मिळाला आणि हे कठीण पात्र साकारण्यासाठी तिला कोणी प्रशिक्षण दिलं याबद्दल खुलासा केला.
आलियाला कसा मिळाला उडता पंजाब?
एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत आलियाने खुलासा केला की, 'उडता पंजाब'ची स्क्रिप्ट जेव्हा तिच्याकडे आली. तेव्हा ती शाहिद कपूरसोबत 'शानदार' चित्रपटाचं शूटिंग करत होती. या भूमिकेने आलिया खूप प्रभावित झाली आणि तिने ही भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली. तिने दिग्दर्शकाची भेट घेतली आणि ती भूमिका ती ही चांगल्या प्रकारे साकारणार असल्याचं त्यांना पटवून दिलं. अभिनेत्री म्हणाली की, तिला या बिहारी मुलीची भूमिका करायची आहे आणि जगाला दाखवायचं आहे की, ती एक अभिनेत्री म्हणून एक सरडा आहे, जी तिच्या पात्रासाठी कितीही रंग बदलू शकते.
कालीन भैयाने दिलं आलियाला ट्रेनिंग
या चित्रपटासाठी मिर्झापूरचा अभिनेता पंकज त्रिपाठी याने तिला प्रशिक्षण दिलं होतं आणि ती अवघड भूमिका साकारण्यासाठी तिला तयार केलं होतं. असा खुलासा आलियाने या मुलाखतीत केला. पंकज रोज अभिषेकसोबत बसून डायलॉग्सवर काम करायचा. पंकजने तिला पंजाबच्या रहिवाशांप्रमाणे बसायला आणि बोलायला शिकवल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. याचबरोबर आलियाला अनेक अभिनय एक्टिंग थिएटर क्लाक करायला मिळालं, ज्यात शरीर मोकळं कसं करायचं आणि सामान्य माणसासारखं कसं बोलायचं, उभं राहायचं या गोष्टींचा समावेश होता.