PHOTO : बॉबी देओलच्या मुलाला पाहून नेटकरी म्हणतात, हा तर धर्मेंद्र...

 आणखी एका अभिनेत्याच्या मुलाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तो अभिनेता म्हणजे बॉबी देओल. 

Updated: Jan 30, 2019, 08:45 AM IST
PHOTO : बॉबी देओलच्या मुलाला पाहून नेटकरी म्हणतात, हा तर धर्मेंद्र...  title=

मुंबई :  २०१८ या वर्षी बऱ्याच स्टार किड्सचं कलाविश्वात पदार्पण झालं आणि त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. एकिकडे जान्हवी कपूर, सारा अली खान इतकच नव्हे, तर शाहरुख खानच्या मुलाचीही चर्चा सुरू असताना दुसरीकडे आणखी एका अभिनेत्याच्या मुलाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तो अभिनेता म्हणजे बॉबी देओल. 

बॉबीने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर आपल्या मुलासोबतचा एक सेल्फी शेअर केला. त्याने हा फोटो शेअर करतात नेटकऱ्यांनी त्यावर लगेचच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या प्रतिक्रिया पाहता एका अर्थी बॉबीच्या मुलामध्ये म्हणजेच आर्यमनमध्ये चाहत्यांना कुठेतरी त्याच्या आजोबांची म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची झलक दिसल्याचं स्पष्ट होत आहे. 

बॉबीने फोटो पोस्ट करताच कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच आर्यमनची तुलना धर्मेंद्र यांच्याशी करण्यास सुरुवात करत अरे, हा तर अगही धर्मेंद्र यांच्यासारखा दिसतो, याचं हसणं, गालावरची खळीसुद्धा धर्मेंद्र यांच्यासारखी आहे अशा प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्यामुळे चाहत्यांनी एका अर्थी त्याचा स्वीकारच केला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बॉबीने पोस्ट केलेला हा फोटो आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहता चाहत्यांचं कलाकारांसोबत असणारं एक वेगळं नातं आणि त्या नात्याप्रती असणारी आत्मियता ही बाबही अधोरेखित होत आहे.  

दरम्यान, वाढदिवसाच्या निमित्ताने मुलासोबतचा फोटो शेअर करणारा बॉबी 'यमला पगला दीवाना- फिरसे' या चित्रपटातून झळकला होता. ज्यानंतर येत्या काळात तो 'हाऊसफुल्ल ४' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मल्टीस्टारर असून, त्यात बॉबी स्वत:चं वेगळेपण सिद्ध करण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.