अनिल कपूरच्या लेकिचा पतीसोबतचा Special Video व्हायरल; केमिस्ट्री तर तौबा तौबा!

प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम... पाहा तिच्या आयुष्यातील Private क्षणांची झलक   

Updated: Oct 8, 2022, 02:44 PM IST
अनिल कपूरच्या लेकिचा पतीसोबतचा Special Video व्हायरल; केमिस्ट्री तर तौबा तौबा!  title=
Bollywood Actor anil kapoor daughter Rhea Kapoor shares private video with husband

Rhea Kapoor Video : एव्हरग्रीन अभिनेता अशी ओळख असणाऱ्या अभिनेता अनिल कपूर (Anil kapoor) यांच्या लेकी म्हणजे फॅशन जगतातील सातत्यानं चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटी. एकिकडे सोनम (Sonam kapoor) तिच्या अफलातून स्टाईल स्टेटमेंट्समुळे चर्चेत असतानाच दुसरीकडे तिची बहीण रिया चक्रवर्तीसुद्धा मागे नाही. 

रिया यावेळी नजरा वळवतेय ती म्हणजे तिचा पती (Rhea Kapoor husband), करण बूलानीनं याच्या वाढदिवसानिमित्तच्या व्हिडीओमुळं. इंस्टाग्राम (Instagram) वर तिनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला जिथं ती पतीचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. 

सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असणाऱ्या रियानं करणच्या बर्थडे पार्टीमध्ये काही फोटो एका व्हिडीओमध्ये कोलाज करत शेअर केले आहेत. इथे पार्टीच्या मेन्यूपासून करण केक कापतानाचे क्षण पाहायला मिळत आहेत. 

अधिक वाचा : 'हा मुलगा मोठा होऊन....', Sonam Kapoor च्या मुलाविषयी मोठी भविष्यवाणी आली समोर

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)

सेलिब्रिटींच्या वाढदिवसाची पार्टी कशी असते, त्यांचं ड्रेसिंग कसं असतं, सेलिब्रेशन कसं असतं? या सर्वच प्रश्नांची उत्तरं रियाच्या या पोस्टमधून मिळत आहेत. प्रेमाच्या माणसाचा वाढदिवस (Birthday) साजरा करत असताना तिचा आनंद उत्तुंग शिखरावर असल्याचं पाहायला मिळत आहे. पतीला Kiss करत ती त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. 

कपूर कुटुंबातील (Kapoor Family) सदस्यांच्या घरी असणाऱ्या या पार्टीमध्ये त्यांच्या मित्रमंडळींचीही उपस्थिती पाहायला मिळाली होती. खास मित्रांच्या उपस्थितीत करणनं वयाची चाळीशी उलटली. हे सुरेख क्षण पाहताना या पार्टीचा अनेकांनाच हेवाही वाटला.