Amir Khan on Bollywood Parties: हिंदी चित्रपटसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या आपल्या 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट काही दिवसांतच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आमीरच्या चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. किंतु सध्या या चित्रपटावरून वातावरण भलतेच तापलेही आहे. सगळीकडे बॉयकॉट लाल सिंग चढ्ढाचे हॅशटॅगही फिरत आहेत, असे असेल तरी आपला चित्रपट ठरल्याप्रमाणे प्रमोट करण्याची जबाबदारीही आमीर खान व्यवस्थितपणे पुर्ण करतो आहे.
अनेक दिवसांपासून करिना कपूर आणि आमीर खान आपला आगामी 'लाल सिंग चढ्ढा' हा चित्रपट प्रमोट करताना दिसत आहेत. या प्रमोशनच्या निमित्ताने आमीर आणि करिना नुकतेच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात हजर होते. या मुलाखतीदरम्यान आमीरने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
आमीरने बॉलीवूडमध्ये चालणाऱ्या लेट पार्टीजबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला की, ''बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्ये कान फाटेपर्यंत म्यूझिक लावले जाते, त्या जोरजोरात वाजणाऱ्या गाण्यांवर लोकं धड नाचतही नाहीत. परंतु मला कळत नाही की नक्की लोकांना अशा पार्ट्या कशा काय आवडतात?'', असे आपले मतं मांडताना आमीर खानने नकळतपणे करण जोहरलाच टोला लगावला. आमीरने करण जोहरच्या पार्टीबद्दल यादरम्यान बोलताना खुलासा केला.
करण जोहरच्या मते आमीर खानचा पार्टीतला व्यवहार काही चांगला नसतो, तो पार्ट्यांमध्ये फारच कंटाळलेला असतो आणि तिथे गेल्यावर तो काहीही करत नाही. यावर उत्तर म्हणून आमीर खान म्हणाला की पार्ट्यांमध्ये इतके लाऊड म्युझिक असते की एकदुसऱ्यांशी बोलतानाही फार अवघड होऊन जाते, असं बोलताना आमीरने करण जोहरच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या पार्टीचे उदाहरण दिले. आमिरने सांगितले की, ''तिथे खूप मोठ्या आवाजात गाणी वाजत होती आणि कोणीही नाचत नव्हते. म्युझिक इतकं जोरात होतं की बोलताना लोकांच्या मानेच्या नसा दिसत होत्या.'', असं अतिशयोक्तीपुर्ण उत्तर आमीर खानने दिले.