रॉयल आयुष्य जगत असलेला अर्जुन कपूर असं काय म्हणाला, ज्यामुळे उंचावल्या अनेकांच्या भुवया...

अर्जून कपूरने एका मुलाखतीदरम्यान एक गौप्यस्फोट केला आहे. 

Updated: Aug 7, 2022, 09:48 AM IST
 रॉयल आयुष्य जगत असलेला अर्जुन कपूर असं काय म्हणाला, ज्यामुळे उंचावल्या अनेकांच्या भुवया... title=

Arjun Kapoor on Star Kid:  बॉलीवूड अभिनेता अर्जून कपूरचा 'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून अर्जून कपूरसह जॉन अब्राहम, दिशा पटनी आणि तारा सुतारिया हे मुख्य भूमिकेत आहेत. सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अर्जून कपूरने एका मुलाखतीदरम्यान एक गौप्यस्फोट केला आहे. 

सध्या अर्जून कपूरचे एक विधान सोशल मीडियावर चर्चेत आहे. या मुलाखतीत अर्जून कपूरने आपल्या करिअरला घेऊन एक खुलासा केला आहे. आपल्या चित्रपटनिवडीबाबत उत्तर देताना अर्जूनने आपण स्टार कीड नाही, कारण मीही ऑडिशन्स देऊनच पुढे आलो आहे अशी ग्वाही दिली आहे.

आपल्या करिअरबद्दल खुलासा करताना या इंडस्ट्रीत आपण अभिनेता अजय देवगण यांना आयडॉल मानत असल्याचे त्याने सांगितले आहे. अर्जून कपूर म्हणाला की, "मी खरोखरच अजय देवगणच्या कारकिर्दीकडे एक आदर्श म्हणून पाहतो. ते माझ्यासाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांची इतक्या वर्षांत ज्या प्रकारे प्रेक्षकांना गुंतवून ठेवलं आहे ही बाब खरोखरच लक्षात घेण्यासारखी आहे. त्यांनी उत्तमोत्तम चित्रपट केले आहेतच पण त्याचसोबत त्यांनी केलेल्या अॅक्शन फिल्म्स मला फार आवडतात त्याचबरोबर त्यांनी गंभीर तसेच विनोदी भुमिकाही केल्या आहेत. ते एक दिग्दर्शक, निर्माताही आहे. मला त्याच्याकडून खूप शिकायचे आहे. कुठेतरी त्यांच्यासारखं मी बननण्याचा प्रयत्न करणार आहे"

मी स्टार कीड नाही - अर्जून कपूर
अर्जून कपूरने जेव्हा बॉलीवूडमध्ये डेब्यू केले तेव्हा सगळ्यांनीच त्याला स्टार कीड म्हणून घोषित केले होते पण आपण स्टार कीड नाही आणि आपला पहिला चित्रपट करण्यासाठीही आपण ऑडिशन दिली असल्याचे त्याने सांगितले. मला स्टार कीड म्हणून सुरूवातीला ओळख प्रेक्षकांकडून मिळाली. पण मी स्टार कीड नाही. खरंतर स्टार कीड म्हणून उल्लेख करायची गरज नाही कारण बॉलीवूडमध्ये येण्यापुर्वी मी कोण आहे, मी कसा दिसतो हे कोणालाच महिती नव्हते. मी शानू शर्मांकडे ऑडिशन दिली. त्यानंतर मला आदित्य चोप्रा यांनी 'इशकजादे' या चित्रपटातून पाहिला ब्रेक दिला, असे अर्जून कपूरने स्पष्ट केले.