सैफच्या 'जवानी जानेमन' चित्रपटाचं पोस्टर रिलीज

सैफचा फनी अंदाज...

Updated: Jan 7, 2020, 07:44 PM IST
सैफच्या 'जवानी जानेमन' चित्रपटाचं पोस्टर रिलीज  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान त्याच्या आगामी 'जवानी जानेमन' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लॉन्च करण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये सैफ अली खानचा फनी लुक पाहायला मिळतोय.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत या 'जवानी जानेमन'चं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टरसोबतच त्यांनी 'जवानी जानेमन'च्या ट्रेलरची तारीखही सांगितली आहे. तरण आदर्श यांनी येत्या ९ जानेवारी २०२० ला ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचं ट्विट केलंय.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सैफ अली खान आणि आलिया फर्नीचरवाला दिसतेय. आलिया जमिनीवर बसली असून तिच्या हातात टेबल फॅन आहे. तर सैफ बाथरोबमध्ये सोफ्यावर पोज देताना दिसतोय.

'जवानी जानेमन'चा टीजर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटात सैफच्या जुन्या 'ओले-ओले'चाही रिमेक आहे. चित्रपटात सैफ आणि आलियाशिवाय तब्बू आणि कुबरा सैतही भूमिका साकारणार आहे. नितिन कड्डक दिग्दर्शित 'जवानी जानेमन' चित्रपटाची जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि सैफ अली खानने निर्मिती केली आहे. ३१ जानेवारी २०२० रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.