मुंबई : टीव्ही शो बालवीर मध्ये भयंकर परी ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शमा सिकंदरचा आज वाढदिवस आहे. शमाचा जन्म १९८१ मध्ये राजस्थानातील मकरानात झाला. पण शमा १० वर्षांची असताना त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. शमाच्या कुटुंबात तिचे आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहिण आहे.
शमाने मकाराना आणि मुंबईत आपले शिक्षण पूर्ण केले. अभिनयात पदवी घेतलेल्या शमाच्या कुटुंबाला अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. अनेकदा तर घरात खाण्यासाठीही काहीही नसे.
शमाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंग केली. त्याचबरोबर तिने अनेक म्युझिक व्हिडिओज आणि काही सिनेमांतही काम केले. 'प्रेम अगन', 'मन' आणि 'अंश' या सिनेमात काम केले. पण हे सिनेमे फारसे चालले नाहीत. तेव्हा मग शमाने पुन्हा आपला मोर्चा टीव्हीकडे वळवला. त्यानंतर शमाने 'ये मेरी लाइफ है', 'सेवन' आणि 'बालवीर' या मालिकांमध्ये काम केले. अलिकडेच तिची 'सेक्सोहॉलिक' ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाली.
एका मुलाखतीत शमाने सांगितले की, एक रात्री तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला. २०११ मध्ये तिला बायपोलर डिसॉर्डर नावाच्या मानसिक आजाराने घेरले. या आजारामुळे ति्च्या मनात अनेकदा आत्महत्या करण्याचे विचार यायचे. पण कालांतराने तिने या आजारावर विजय मिळवला.
जानेवारी २०१६ मध्ये शमा सिकंदरने जेम्स मिलिरॉनसोबत साखरपुडा केला. दुबईतील ७ स्टार हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्याचे फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले. पण त्यात शमाला ओळखता येणे फार कठीण होते. कारण सर्जरी करुन तिने आपला लूक बदलला होता. पण याबद्दल तिने बोलणे टाळले.