बर्थडे स्पेशल : 'या' लोकप्रिय दिग्दर्शकाच्या घटस्फोटाला कारणीभूत ठरली हुमा कुरेशी!

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री हुमा कुरेशीचा २८ जुलै म्हणजेच आज ३२ वा वाढदिवस आहे.

Updated: Jul 28, 2018, 11:51 AM IST
बर्थडे स्पेशल : 'या' लोकप्रिय दिग्दर्शकाच्या घटस्फोटाला कारणीभूत ठरली हुमा कुरेशी! title=

मुंबई : बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री हुमा कुरेशीचा २८ जुलै म्हणजेच आज ३२ वा वाढदिवस आहे. हुमाने आपल्या करिअरची सुरुवात गॅंग्स ऑफ वासेपूर या अनुराग कश्यपच्या सिनेमातून केली. हुमाला बॉलिवूडमध्ये ६ वर्ष झाली असून तिने एकापेक्षा एक सरस भूमिका करत बॉलिवूडमध्ये आपले चांगले नाव कमावले आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...

# हुमा कुरेशीने दिल्ली युनिव्हर्सिटीच्या गार्गी कॉलेजमधून इतिहासात बॅचलर डिग्री घेतली आहे. त्याचबरोबर ती दिल्लीच्या थिएटर ग्रुपशी संलग्न होती.

# सिनेमात येण्यापूर्वी तिने जाहिरातींमध्ये काम केले होते. पिअर्स साबण, सॅमसंग आणि नेरोलेकच्या जाहिरातींमध्ये ती झळकली होती.

# गॅंग्स ऑफ वासेपूर पूर्वी हुमा कुरेशी तामिळ सिनेमा बिला 2 मधून डेब्यू करणार होती. पण सिनेमाला विलंब होत असल्याने हुमाने त्यातून काढता पाय घेतला. 

# सॅमसंगच्या जाहिरातीत हुमा कुरेशीला पाहिल्यावर अनुराग कश्यपने तिला सिनेमात घेण्याचा निर्णय घेतला. आणि हुमा गॅंग्स ऑफ वासेपूरमध्ये झळकली.

# इतकंच नाही तर अनुराग कश्यप आणि कल्की कोचलिन यांच्या घटस्फोटालाही हुमा कुरेशी जबाबदार असल्याची चर्चा होती. अनुराग आणि हुमाच्या वाढत्या जवळीकीमुळे त्या अनुराग-कल्कीच्या नात्यात दरी निर्माण झाली.

# हुमा कुरेशीचे नाव बॉबी जासूसचा अभिनेता अर्जन बजवासोबतही जोडले गेले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही.

# हुमा कुरेशीने आपल्या छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये सर्व खास भूमिका साकारल्या. पण विशेष बाब ही की, तिने अधिकतर अनुराग कश्यपच्या सिनेमात काम केले आहे. सुजाता सिनेमातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.