अमिषाच्या या गोष्टीवरुन आईने चप्पलेने मारत घराबाहेर काढले...

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलचा जन्म ९ जून १९७६ मध्ये मुंबईत झाला. 

Updated: Jun 9, 2018, 11:08 AM IST
अमिषाच्या या गोष्टीवरुन आईने चप्पलेने मारत घराबाहेर काढले... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलचा जन्म ९ जून १९७६ मध्ये मुंबईत झाला. गुजराती परिवारातील या मुलीने २००० मध्ये आलेल्या कहो ना प्यार है सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. त्यानंतर तिने हमराज, गदर यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले. आता सध्या ती तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोजमुळे चर्चेत असते. वाढदिवसानिमित्त अमिषा पटेलबद्दल काही रंजक गोष्टी...

# सिनेमात येण्यापूर्वी तिचे बिजनेसमॅन नेस वाडियासोबत अफेअर होते. दोघेही कॉलेजपासून एकत्र होते. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही रिलेशनशीपमध्ये असताना नेस वाडियाला अमिषासोबत लग्न करायचे होते पण अमिषाला करिअर घडवायचे असल्याने दोघांचे ब्रेकअप झाले. 

# नेस वाडियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिचे नाव दिग्दर्शक-निर्माता विक्रम भट्टसोबत जोडले गेले. पण तिचे कुटुंबिय यामुळे नाखुश होते. विक्रमसोबत असलेल्या नात्यामुळे तिच्या आईने तिला चप्पलने मारत घराबाहेर काढले होते, असे अमिषाने एका मुलाखतीत सांगितले. 

# अमिषा पटेल आणि विक्रम भट्ट यांचे नाते चांगलेच चर्चेत होते. मात्र २००८ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर प्रॉपर्टीवरुन अमिषा आणि तिच्या कुटुंबियांमध्ये वाद झाले. तिने १२ कोटींची अफरातफर केल्याचा आरोप तिच्या वडीलांनी तिच्यावर लावला. तर वडील पैशांचा गैरवापर करत असल्याचे तिचे म्हणणे होते.

# अमिषा आता मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये दिसते. अनेकदा ती दारुच्या नशेतच असते. टी.व्ही. अभिनेता कुशाल टंडनसोबतही तिचे जोरदार भांडण झाले होते. त्यामुळे ती चर्चेत आली होती.