कीथ सिकेरा आणि रोशेल रावच्या लग्नाचे खास फोटो

 रोशेल राव आणी कीथ सिकेराने तामिळनाडूच्या महाबलिपुरममध्ये रविवारी लग्न केलं. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Mar 5, 2018, 02:46 PM IST
कीथ सिकेरा आणि रोशेल रावच्या लग्नाचे खास फोटो  title=

मुंबई : रोशेल राव आणी कीथ सिकेराने तामिळनाडूच्या महाबलिपुरममध्ये रविवारी लग्न केलं. 

दोघांनी सोशल मीडियावरून दिली माहिती. दोघं एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत होते. 

Keith Sequeira, Rochelle Rao

असं सांगितलं जातं की दोघांनी गेल्यावर्षी साखरपुडा केला होता. तेव्हा देखील अधिकृत माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली होती. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, एका वर्षानंतर ते दोघे लग्न करणार आहेत. 

Keith Sequeira, Rochelle Rao

रोशेल आणि कीथ बिग बॉस 9 मध्ये दिसले होते. आणि त्यानंतर ते दोघे भरपूर चर्चेत होते. शोमध्येच दोघे एकमेकांच्या भरपूर जवळ होते. 

Keith Sequeira, Rochelle Rao

एवढंच नाही तर बिग बॉसने कीथ आणि रोशेल यांना लग्न करण्यास सांगितलं. तेव्हा कीथने आपल्या नात्याला आणखी काही वेळ हवा असं स्पष्ट केलं होतं. 

Keith Sequeira, Rochelle Rao

कीथ आणि रोशेलने डेस्टिनेशन वेडिंग केली असून यांच्या लग्नाला अभिनेत्री एवलीन शर्मा देखील सहभागी होती. 

Keith Sequeira, Rochelle Rao

हे दोघे पहिल्यांदा एका फ्लाइटमध्ये भेटले होते. त्यानंतर सोशल मीडियावरून त्यांची ही ओळख कायम राहिले. 

Keith Sequeira, Rochelle Rao

कीथ आणि रोशेल यांनी अवघ्या काही खास मित्र परिवारासोबत हे लग्न केलं.