Manike Mage Hithe गाणं म्हणता म्हणता सलमानला का आठवल्या श्रीदेवी...पाहा व्हिडीओ

 बिग बॉस 15 ची सुरुवात दणक्यात झाली आहे.

Updated: Oct 9, 2021, 09:55 PM IST
 Manike Mage Hithe गाणं म्हणता म्हणता सलमानला का आठवल्या श्रीदेवी...पाहा व्हिडीओ title=

मुंबई : बिग बॉस 15 ची सुरुवात दणक्यात झाली आहे. बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आजकाल सलमान बिग बॉस 15मुळे चर्चेत आहे. शनिवारी सलमान या सिझनमधील पहिल्या वीकेंड का वारचं आयोजन करणार आहे. वीकेंड का वारचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर समोर आले आहेत. त्याचबरोबर श्रीलंकन ​​गायक योहानी देखील सलमानसोबत एका प्रोमोमध्ये दिसत आहे.

योहानी वीकेंड का वार मध्ये दिसणार 
चॅनलनं बिग बॉस 15चा वीकेंड का वारचा प्रोमो शेअर केला आहे. इंटरनेट सेन्सेशन श्रीलंकन ​​गायक योहानी या प्रोमोमध्ये सलमान खानसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये योहानीचा सलमान खान मणिके माघे हिथे हे गाणं गाताना दिसत आहे. सलमानने गाणं योग्यरित्या गायलं आहे, मात्र जेव्हा त्याला पुढील गाणं समजत नाही, तेव्हा तो श्रीदेवी यांचं नाव घेतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याचबोरबर प्रतिक सहजपाल त्याच्या आक्रमक वृत्तीमुळे, त्याला केवळ कुटुंबातील सदस्यांच्याच नव्हे तर प्रेक्षकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. आणि आता असं दिसत आहे की, प्रतीक सहजपाल या वीकेंड का वार मध्ये होस्ट सलमान खान कडून खूप फटकार घेणार आहे. त्यामुळे विकेंड का वॉरमध्ये नेमकं काय काय पहायला मिळणार याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं आहे.