असं असणार यंदाचं 'बिग बॉस'चं घरं, पाहा फोटोज

'बिग बॉस' म्हटलं की हमखास चर्चा तर होणारचं. 'बिग बॉस' मध्ये कुणाचा सहभाग असणार यापासून आजच्या दिवशी काय होणार यावर अनेक चर्चा रंगतात.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 30, 2017, 06:50 PM IST
असं असणार यंदाचं 'बिग बॉस'चं घरं, पाहा फोटोज  title=
Image: Twitter

नवी दिल्ली : 'बिग बॉस' म्हटलं की हमखास चर्चा तर होणारचं. 'बिग बॉस' मध्ये कुणाचा सहभाग असणार यापासून आजच्या दिवशी काय होणार यावर अनेक चर्चा रंगतात.

तसेच 'बिग बॉस'चं घर कसं असणार याचीही अनेकांना उत्सुकता असते. बिग बॉसच्या घरात आपल्याला जाणं शक्य नसलं तर काय झालं? आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत 'बिग बॉस सीजन ११' मधील घरं नेमकं कसं असणार आहे.

बिग बॉस संदर्भात अनेक बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, त्यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. नंतर, या शोचा फर्स्ट लूक काही वेळापूर्वी कलर्सचे सीईओ राज नायक यांनी शेअर केला होता.

आता 'बिग बॉस' च्या घराचे दोन नवे फोटोज समोर आले आहेत आणि ते सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत. यापैकी एका फोटोमध्ये 'बिग बॉस'चं लिव्हींग रुम पहायला मिळत आहे. नेहमी प्रमाणेच यावेळीही फर्निचर आणि डिझाईन खूपच वेगळं आहे.

शोची थिम पाहून असे वाटत आहे की, यंदाचा सीजनही खूपच इंटरटेनिंग असणार आहे.