मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. अश्लील चित्रपट चित्रीत करून ते ऑनलाईन प्रदर्शित केल्यामुळे राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. अशात मुंबई हायकोर्टाने राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रयान थोर्प यांची याचिका फेटाळली आहे. ज्यात न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला आव्हान देऊन त्वरित सोडण्याची मागणी करण्यात आली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने 2 ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आदेश राखून ठेवला होता. आज न्यायमूर्ती ए एस गडकरी यांनी यावर निर्णय दिला आहे. दरम्यान राज कुंद्राच्या वकिलांनी त्याला चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचे म्हटले होते. सध्या राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरण तुफान चर्चेत आहे.
Pornography case | Bombay High Court dismisses businessman and actor Shilpa Shetty's Raj Kundra and Ryan Thorpe's applications challenging magistrate court's remand order and seeking immediate release.
(File photo) pic.twitter.com/yajoVxT9Og
— ANI (@ANI) August 7, 2021
त्याचवेळी, पोलिसांनी सांगितले की राजने सीआरपीसीच्या कलम 41 (ए) वर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता, त्यानंतर राजला अटक करण्यात आली. शिल्पा शेट्टीने देखील अनेक वेळा पती राज कुंद्राच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला. पण कोर्टाने सर्व याचिका फेटाळल्या आहेत.
एवढंच नाही तर पॉर्नोग्राफी प्रकरणी अधिक माहिती मिळविण्यासाठी शर्लिन चोप्रा आणि गहना वशिष्ठची देखील चौकशी केली जात आहे. शिवाय या प्रकरणी रोज नवे खुलासे होत असून रोज नवीन प्रकरण समोर येत आहे.