एका ट्विटसाठी बिग बींना मोजावे लागणार ३२ रुपये?

अमिताभ बच्चन सध्या त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे चांगलेच चर्चेत आहेत.

Updated: Jun 24, 2019, 10:39 AM IST
एका ट्विटसाठी बिग बींना मोजावे लागणार ३२ रुपये?  title=

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. कोणत्याची घटनेची चाहूल लागताच ते आपले मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडतात. त्याचप्रमाणे बिग बी सोशल मीडियावर कविता आणि त्याच्या आयुष्यातील जुन्या आठवणींना नेहमीच उजाळा देत असतात. अमिताभ बच्चन सध्या त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे चांगलेच चर्चेत आहेत. अमिताभ बच्चनने एक कविता ट्विट पोस्ट केली. ज्यानंतर एका लेखकाने ती कविता आपली असल्याचे सांगत, त्या कवितेवर स्वत:चा हक्क गाजवला. 

त्यानंतर लेखक प्रबुद्ध सौरभ यांनी विनोदी अंदाजात या पोस्टमध्ये आपली ३२ रूपयांची भागिदारी असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी बिग बींना सुद्धा टॅग केले आहे. या विनोदी पोस्टला रि-ट्विट करत प्रबुद्ध सौरभ यांनी सांगितले की, 'या कवितेची रचना २०१७मध्ये केली गेली होती.'

अमिताभ बच्चन सध्या त्यांचा आगामी 'गुलाबो सिताबो' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर अमिताभ यांच्या या लूकची चर्चा चांगलीच रंगली होती.