...म्हणून बीग बी आजच्या दिवसाला मानतात पुनर्जन्म

मृत्यूच्या दारातून अमिताभ बच्चन परतल्याच्या या घटनेला आज ३६ वर्षे पुर्ण झाली.

Updated: Aug 2, 2018, 04:31 PM IST
...म्हणून बीग बी आजच्या दिवसाला मानतात पुनर्जन्म  title=

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आजच्या दिवसाला अर्थात २ ऑगस्टला पुनर्जन्मचं मानतात  कारण मृत्यूच्या दारातून अमिताभ बच्चन परतल्याच्या या घटनेला आज ३६ वर्षे पुर्ण झाली.कुली चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी मारामारीच्या दृश्यादरम्यान अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते.  केवळ चाहत्यांच्या प्रार्थना आणि शुभेच्छांमुळे मी जिवंत आहे अशी भावना व्यक्त करत ट्विटरवरुन चाहत्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हे ऋण मी फेडू शकणार नाही. असंही त्यांनी म्हटलंय.

अशी घडला प्रसंग 

१९८२ साली कुली चित्रपटाचे चित्रिकरण बंगलोरमध्ये सुरु होते. अभिनेते पुनित इस्सार यांच्याकडून अमिताभ बच्चन यांना मारहाण होते असे एक दृश्य चित्रित करताना अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मुंबईत हलवण्यात आहे त्यानंतर अनेक दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती.अमिताभ बच्चन यांना आजही त्या आठवणी व्य़थित करतात...२ ऑगस्ट हा माझा दुसरा जन्मदिवस  असल्याचे ते मानतात.