जया बच्चन यांच्यापूर्वी Amitabh Bachchan यांच्या आयुष्यात होती वेगळीच मुलगी

खुद्द बिग बींनीच केला खुलासा

Updated: Oct 11, 2021, 11:05 AM IST
जया बच्चन यांच्यापूर्वी Amitabh Bachchan यांच्या आयुष्यात होती वेगळीच मुलगी  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बिग बी, महानायक, शहनशाह अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्यावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अमाप रसिकांचं प्रेम मिळवणारा हा चेहरा त्याच्या खासगी आयुष्यामुळंही कायमच चर्चेत राहिला. बिग बींनी जितका रुपेरी पडदा गाजवला, तितकंच रंजक त्यांचं खासगी आयुष्यही असल्याचं पाहायला मिळालं.

खुदद् बिग बींनीच त्यांच्या खासगी आयुष्यातील काही पैलू सर्वांसमोर उलगडल्याचंही पाहायला मिळालं आहे. यापैकीच एक किस्सा सांगताना त्यांनी पत्नी जया बच्चन यांच्याहीपूर्वी आपल्या आयुष्यात आलेल्या एका खास व्यक्तीचाही खुलासा केला होता.

ही गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा अमिताभ बच्चन दिल्लीत शिकत होते आणि डीटीसीच्या बसने प्रवास करत होते. मुख्य म्हणजे अमिताभ बच्चन महाविद्यालयीन दिवसांमध्ये कधीच त्या मुलीशी बोलू शकले नव्हते. पण, अनेक वर्षांनी जेव्हा ते तिला भेटले तेव्हा या भावनांचा उलगडा झाला. त्या महिलेनं बिग बींकडे उलगडा केला की, ती बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असायची.

त्या काळात त्या मुलीचा एक मित्र होता, ज्याचं नाव होतं प्राण. ते दोघंही अनेकदा बसने एकत्र दिसायचे. तेव्हा त्या महिलेच्या मनात एकच भावना असायची की तिचा मित्र, प्राण गेला तरी चालेल पण बच्चन यांची बस चुकता कामा नये. थोडक्यात काय तर, 'प्राण (उसका दोस्त) जाए पर बच्चन न जाए!' अशीच काहीशी तिची भावना असायची.