भूषण कडूवर कोसळला दुःखाचा डोंगर, कोरोनामुळे पत्नीला गमावले

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्यांना गमावलं 

Updated: May 30, 2021, 06:56 AM IST
भूषण कडूवर कोसळला दुःखाचा डोंगर, कोरोनामुळे पत्नीला गमावले  title=

मुंबई : कोरोनाच्या रोगाने गंभीर रूप धारण केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. मालिका, सिनेमा आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता भूषण कडूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भूषण कडूने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्या पत्नीला गमावलं आहे. 

काही दिवसांपूर्वी अभिनेता भूषण कडू आणि त्याची पत्नी कादंबरी कडू यांना कोरोनाची लागण झाली होती. भूषण बोरिवली येथील रूग्णालयात उपचार घेत होता. कादंबरी यांची तब्बेत बिघडली असल्यामुळे त्यांना ठाण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhushan Kadu (@bhushankaduofficial)

कोरोनाकाळात मनोरंजन क्षेत्र पूर्णपणे ठप्प आहे. अशावेळी भूषण कडू कामाच्या शोधात होता. यातच त्यांना कोरोनाची लागण झाली. उपचाराकरता मदतीची गरज होती. सोशल मीडियावर भूषण कडू आणि त्याच्या पत्नीला कादंबरीला आर्थिक मदतीसाठी मॅसेज देखील फिरत होते. 

मात्र कादंबरी या कोरोनावर कादंबरी मात करू शकली नाही. 29 मे 2021 रोजी कादंबरीचं कोरोनामुळे निधन झालं. भूषण आणि कादंबरीला प्रकिर्त नावाचा लहान मुलगा आहे. कादंबरी ही सोमय्या कॉलेजमधील विद्यार्थिनी असून ती देखील कला क्षेत्राशी निगडीत होती.  ती नाटकाचं बॅक स्टेज सांभाळत असे. 

मराठी बिग बॉसमुळे भूषण कडू यांचं कुटूंब प्रकाशझोतात आलं. भूषण आणि कादंबरीची ओळख एका नाटका दरम्यान झाली होती. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनयासोबतच कादंबरी उत्तम वाद्य वाजवण्यात पारंगत असल्याचं भूषण कडूने सांगितलं होतं.