प्रसाद खांडेकरसोबतच्या कथित वादावर उघडपणे बोलले भाऊ कदम; म्हणाले- 'आम्ही प्रतिस्पर्धी...'

Bhau Kadam and Prasad Khandekar : भाऊ कदमनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आणि प्रसाद खांडकेरच्या नात्यावर वक्तव्य केलं आहे. 

Updated: Dec 8, 2023, 04:53 PM IST
प्रसाद खांडेकरसोबतच्या कथित वादावर उघडपणे बोलले भाऊ कदम; म्हणाले- 'आम्ही प्रतिस्पर्धी...' title=
(Photo Credit : Social Media)

Bhau Kadam : सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे मराठमोळा अभिनेता आणि विनोदवीर प्रसाद खांडेकरच्या ‘एकदा येऊन तर बघा’ची. आज हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून प्रसाद हा फक्त एक अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून देखील पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्यांचा एक हॉटेलचा बिझनेस असल्याचे पाहायला मिळणार आहे. दरम्यान, यावेळी भाऊ कदम हे त्यांच्या आणि प्रसाद खांडेकरच्या मैत्रीविषयी बोलला आहे. 

भाऊ कदमनं ही मुलाखत 'महाराष्ट्र टाईम्स'ला दिली होती. चित्रपटाविषयी बोलल्यानंतर भाऊ कदम त्यांच्या आणि प्रसाद खांडेकरच्या मैत्री विषयी बोलले आहेत. ते म्हणाले की मला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येतात. पण एकीकडे मालिकेचे चित्रीकरण आणि दुसरीकडे नाटकाचे प्रयोग, असं सगळं सुरु असताना. चित्रपटाच्या चित्रीकरणाला तारखा देता येत नाही. या सगळ्यात प्रसादनं सगळं चोख नियोजन करत मला चित्रपटातील एक भूमिका दिली. प्रेक्षकांसाठी छोट्या पडद्यावर आम्ही प्रतिस्पर्धी वाटत असलो तरी आम्ही खूप चांगले मित्र आहोत. प्रसाद हा नेहमीच सर्वांनाच पुढे घेऊन जाण्याचा विचार करतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर आज 8 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने  राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने आणि सुशील इनामदार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती ही परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दीपक क्रिशन चौधरी, सेजल दीपक पेंटर यांनी केली आहे. तर अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, दिवाळीमध्ये चित्रपटगृहांमधील हिंदी-मराठी चित्रपटांची वाढलेली गर्दी लक्षात घेता दोन आठवडे पुढे ढकलण्यात आला होता 

काय आहे कथा? 

फुलंब्रीकर या कुटुंबाला अचानक एके दिवशी 20 लाख रुपये मिळतात आणि पुढं या कुटुंबातील तिघं भाऊ मिळून एक नवीन हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या हॉटेलमध्ये नेमके कोणते पाहुणे येणार, पटकथेत काय ट्विस्ट येणार, एका माणसाच्या मृत्यूनंतर फुलंब्रीकर कुटुंबासमोरच्या अडचणी कशा वाढणार हे सगळं मनोरंजक पद्धतीनं दाखवण्यात येणार आहे.