Bharti Singh With Kareena Kapoor Khan : लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) तिचा मुलगा लक्ष्यचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. गोला भारतीसोबत सगळीकडे असतो. दरम्यान, नुकत्याच एका रिअॅलिटी शोमध्ये भारतीनं मुलीची इच्छा आहे असं सांगितलं. त्यासोबत प्रेग्संसीवेळी तिला आणखी कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला त्याविषयी देखील तिनं अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
भारतीनं हे मुलाखत करीना कपूरला दिली होती. भारतीनं करीना कपूर खानच्या (Kareena Kapoor Khan) 'व्हाट वूमेन वॉन्ट' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी गोलानं मॉलमध्ये गोंधळ घालावा हट्ट करावा अशी तिची इच्छा आहे. ती करीनाला म्हणाली की, मला हट्टी मुलं आवडतात. माझ्या मुलानं मॉलमध्ये झोपून अशा गोष्टी कराव्यात जेणेकरून माझा अपमान होईल. हे ऐकताच करीना आश्चर्यचकीत होऊन तिच्याकडे पाहते. कारण काही दिवसांपूर्वीच तैमुरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात पापाराझींसमोर तो असा हट्ट करत होता.
पुढे भारती प्रेग्नंट असताना तिला लोकांनी किती घाबरवलं याविषयी तिनं सांगितलं आहे. लोक इतकं घाबरवण्याचा प्रयत्न करतात, ते पाहून तुम्हाला असं वाटतं असेल की तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. आई झाल्यानंतर बोलतात की आता आई झाली ना बघ आता काही करू शकणार नाही. मी विचार केला की मी खूप मोठी चूक केली. अनेकांनी मला सांगितलं की मला घरी बसावं लागेल, मी आता पार्टी करू शकणार नाही. पण काही बदललं नाही, आमचा मुलगा खूप मस्त आहे.
हेही वाचा : 'गिनते गिनते रुकेगा नही साला', Pushpa 2 साठी Allu Arjun नं घेतलं इतकं मानधन?
पुढे प्रेग्नंसीविषयी बोलत असताना भारती म्हणाली, तिला परत एकदा आई व्हायचं आहे. पण यावेळी तिला मुलगी हवी आहे. त्यावर बोलताना भारती करीनाला म्हणाली, तू कोणत्या अशा डॉक्टरला ओळखतेस का जो इंजेक्शन दिल्यानंतर दावा करतो की मला मुलगीच होईल? यावर करीना हसली आणि म्हणाली, मला दोन मुलं आहेत, मला याविषयी काही माहित नाही.
दरम्यान, नुकताच भारतीनं तिचा मुलगा लक्ष्यचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी तिनं लक्ष्यचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये लक्ष्यचं गोंडस फोटो दिसले. भारतीच्या खासगी आयुष्या विषयी बोलायचं झालं तर 3 डिसेंबर 2017 साली तिनं हर्ष लिंबाचियाशी लग्न केलं. त्यानंतर 3 एप्रिल 2022 रोजी भारती आणि हर्ष आई-वडील झाले. त्याच दिवशी भारतीनं आपल्या सगळ्यांता लाडका गोला उर्फ लक्ष्यचा जन्म झाला.