Rhea Chakraborty : "...मैं डर जाऊंगी", सुशांत प्रकरणानंतर तीन वर्षांनी रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत

Sushant Singh Rajput Case : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतप रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली. रियाने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रिया सुमारे तीन वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

श्वेता चव्हाण | Updated: Apr 10, 2023, 05:31 PM IST
Rhea Chakraborty : "...मैं डर जाऊंगी", सुशांत प्रकरणानंतर तीन वर्षांनी रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत title=
Rhea Chakraborty to return with Roadies 19

Rhea Chakraborty : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) चांगलीच चर्चेत आली. तेव्हापासून तिच्या प्रत्येक गोष्टीवर नेटकऱ्यांची नजर असून तिची छोट्यातली छोटी गोष्ट चर्चेचा विषय ठरत असते. ड्रग्ज प्रकरणात रिया तुरूंगात होती. यानंतर अनेक महिने रियाने स्वत: ला घरात कैद करुन घेतलं होतं. सोशल मीडियापासूनही ती लांबच ठेवलं होतं. मात्र आता हळूहळू रियाने नव्याने सुरुवात केली असून रिया सुमारे तीन वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) कॅमबॅक केले असून लोकप्रिय रिअॅलिटी शो एमटीव्ही रोडिज् 196 (MTV Roadies 196) मध्ये झळकण्यासाठी सज्ज आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय साहसी रिअॅलिटी टेलिव्हिजन शो MTV रोडीज फ्रँचायझी या सीझन 19 मध्ये 'कर्म या कांड' या थरारक थीमसह प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे. अभिनेता सोनू सूद या सीझनचे सूत्रसंचालन करणार आहे तर अया शोचे 3 गँग लीडर म्हणून अभिनेत्री रिया चक्रवर्ती, प्रिन्स नरुला, गौतम गुलाटी यांची नावे समोर आली आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MTV Roadies (@mtvroadies)

अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या रिया चक्रवर्तीचा या ब्रँडशी जुना संबंध आहे. रियाने (Rhea Chakraborty)  तिच्या करिअरची सुरुवात MTV वर VJ म्हणून केली होती. त्यानंतर त्याने चित्रपटांमध्ये पदार्पण केले. सीझन 19 चा एक भाग असल्याबद्दल बोलताना, गँग लीडर रिया चक्रवर्ती म्हणाली, “मी एमटीव्ही रोडीज करमा या कांड या अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शोचा एक भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे. रियाने या शोचा प्रोमो शेअर केला असून,"आपको क्या लगा मैं वापस नहीं आऊंगी. डर जाऊंगी. डरने की बारी किसी और की है. मिलते है ऑडिशंस पर... असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसली. 

एमटीव्ही रोडीजमध्ये गँग लीडर 

रोडीजच्या नवीन सीझनसाठी मल्टी-सिटी ऑडिशन्स सुरू होणार आहेत. MTV रोडीज कर्म या कांड मधील एकमेव महिला गँग लीडर म्हणून रियाची धाडसी आणि उत्साही बाजू पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.