मुंबई : प्रेम एक अशी गोष्ट आहे, जी फक्त आपण अनुभवू शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते, जी प्रचंड खास असते. सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे इंटरनेटवर पार्टनरसोबत फोटो पोस्ट करत आयुष्यातील खास व्यक्तीवर प्रेम व्यक्त करतात. सध्या 'मैंने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पती हिमालयसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे.
खुद्द भाग्यश्रीने पतीसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पती हिमालयसोबत डान्स करताना दिसत आहे. फिक्या रंगाच्या साडीमध्ये भाग्यश्रीदेखील प्रचंड सुंदर दिसत आहे. एवढंच नाही तर, दोघे मजेत डान्स करताना दिसत आहे.
भाग्यश्री आणि हिमालय 'पिया ओ रे पिया' गाण्यावर ताल धरताना दिसत आहे. भाग्यश्री आणि हिमालय रोमँटिक अंदाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील दोघांचा अंदाज आवडला आहे.
त्यांच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं, 'फार सुंदर... नजर नको लागयला..', तर दुसरा चाहता कमेंट करत म्हणतो, 'पहला प्यार है लगता है...' सध्या त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.