मुंबई : विविध पदार्थांची चव चाखायला कुणाला आवडत नाही? त्यातही जर पानात आपल्या आवडीचे पदार्थ आले, की चे खाण्याची मजा काही औरच. तुम्ही कधी एखाद्या पदार्थावर ताव मारून त्याचा आस्वाद घेतला आहे का? अर्थात तुमचं उत्तर हो असेल. पण, तुम्ही कधी एकाहून जास्त पदार्थ अमर्यादपणे खाल्ले आहेत का?
कदाचित या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही विचारात पडाल. पण, एका बॉलिवूड अभिनेत्रीनं मात्र कमालच केलीये. इन्स्टाग्रामवर तिनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बऱ्याच पदार्थांची चव चाखताना दिसत आहे.
तिची ही अनलिमिटेड खादाडी पाहत असताना फॉलोअर्सही हैराण झाले आहेत. पेस्ट्री, बिर्याणी, पनीर टिक्का, कॉर्न असे एक ना अनेक पदार्थ ही अभिनेत्री खाताना दिसत आहे. बरं, पाणीपुरीवरही ताव मारायलाही ती विसरलेली नाही.
ही अभिनेत्री आहे, भाग्यश्री लिमये. भाडीपच्या 'कांदे पोहे' या व्हिडीओंमध्ये आपलं पुण्यावर असणारं प्रेम व्यक्त करणारी आणि अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात घर करणारी भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. (bhagyashree limaye shares insstagram reel video of her unlimited eating)
तिनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिथे ती एक असा प्रसंग सर्वांसमोर आणताना दिसते जो आपल्यापैकी अनेकांनीच अनुभवला असेल. एखाद्या ठिकाणी बफेसाठी पैसे भरले जातात तेव्हा जेवण अनलिमिटेड जेवणावर आडवा हात मारत पैसे वसून करण्यावर सर्वांचाच भर असतो. भाग्यश्रीचा हा व्हिडीओ पाहताना तीसुद्धा असंच काहीसं करताना दिसत आहे.
तिच्या या खादाडीचा व्हिडीओ पाहून त्यावर फॉलोअर्स आणि चाहत्यांनी काही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. तुम्हाला कसा वाटला तिचा हा व्हिडीओ ?