बहुचर्चित 'वस्त्रहरण' नाटक पाहण्याची अखेरची संधी, राज्यभरात होणार 'इतके' प्रयोग

 भद्रकाली प्रोडक्शनने याबद्दलची पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.   

Updated: Feb 17, 2024, 10:23 PM IST
बहुचर्चित 'वस्त्रहरण' नाटक पाहण्याची अखेरची संधी, राज्यभरात होणार 'इतके' प्रयोग title=

Vastraharan Marathi Natak : मच्छिंद्र कांबळी यांच्या 'वस्त्रहरण' हे धमाल विनोदी मालवणी नाटकाचे लाखो चाहते आहेत. या नाटकाचे आतापर्यंत 5 हजारहून अधिक प्रयोग झाले. मराठी नाट्यसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय नाटक म्हणून ‘वस्त्रहरण’ कडे पाहिले जाते. आता पुन्हा एकदा हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच भद्रकाली प्रोडक्शनने याबद्दलची पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 

'वस्त्रहरण' नाटकाला 44 वर्षे पूर्ण

मालवणी भाषेचा झणझणीतपणा असलेल्या वस्त्रहरण नाटकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या नाटकाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मच्छिंद्र कांबळी यांचे हे नाटक 16 फेब्रुवारी 1980 मध्ये रंगभूमीवर आले. या नाटकाची लोकप्रियता आजही कायम आहे. या नाटकाने व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. या नाटकाला 16 फेब्रुवारी 2024 रोजी 44 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तानेच भद्रकाली प्रोडक्शनने एक गुडन्यूज दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhadrakali Productions (@teambhadrakali)

वस्त्रहरण नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

'वस्त्रहरण' हे नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाचे मोजकेच 44 प्रयोग सादर केले जाणार आहेत. या विशेष 44 प्रयोगांसाठी मराठी रंगभूमीवरील दिग्गज कलाकारांचा सहभाग असणार आहे. पण अद्याप यात कोणकोणते कलाकार असणार याची माहिती समोर आलेली नाही.  

वस्त्रहरण नाटकाचा 5000 वा प्रयोग मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला होता. हा प्रयोग 21 नोव्हेंबर 2009 रोजी पार पडला होता. या खास प्रयोगात प्रशांत दामले, भरत जाधव, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे, अतुल परचुरे, सिद्धार्थ जाधव, पंढरीनाथ कांबळे, जितेंद्र जोशी, किशोर चौघुले, जयवंत वाडकर इत्यादी कलाकारांनी प्रमुख भूमिका सादर केली होती. तात्या सरपंच यांची भूमिका संतोष मयेकर यांनी केली होती. या नाटकाचे लेखन गंगाराम गव्हाणकर यांनी केले होते.