काय सांगता! Sunny Leone ने भरला युपी पोलीस भरतीचा फॉर्म? हॉल तिकीट पाहून होईल डोक्याचा भूगा

Sunny Leone In UP Police bharti : सोशल मीडियावर सनी लिऑनीच्या नावाचं एक ऍडमिट कार्ड व्हायरल झालंय. हे प्रवेशपत्र अभिनेत्री सनी लिऑनीच्या नावाने जारी करण्यात आलंय.   

सौरभ तळेकर | Updated: Feb 17, 2024, 09:28 PM IST
काय सांगता! Sunny Leone ने भरला युपी पोलीस भरतीचा फॉर्म? हॉल तिकीट पाहून होईल डोक्याचा भूगा title=
Sunny Leone In UP Police bharti

Sunny Leone Admit Card : उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे तीन तेरा झाल्याचं नेहमी पहायला मिळतं. सरकार कोणतंही असो स्थानिक लोकांना गुंडागिरी आणि गँगवारच्या कळा सोसाव्या लागतात. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पोलीस कॉन्स्टेबल भरती केली जात आहे. युपी पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) भरती 2024 साठी लेखी परीक्षा आयोजित केली गेलीये. या परीक्षेत कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी कडक पावलं उचलण्यात आल्याचं पहायला मिळतंय. मात्र, याच पार्श्वभूमीवर आता धक्कादायक बातमी समोर आलीये. उत्तर प्रदेश पोलीस भरती साठी आता चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनी हिने फॉर्म भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नक्की प्रकरण काय आहे? सनी लिऑनीने खरंच पोलीस भरतीसाठी फॉर्म भरला की काय? पाहुया..

उत्तर प्रदेश पोलीस भरती प्रकियेत सुरक्षेचा भाग म्हणून प्रत्येक परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारापासून प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, तरी देखील पेपर फुटीचा प्रकार समोर आलाय. त्यावर पोलिसांनी साफ नकार देत वृत्त खोटं असल्याचं म्हटलंय. मात्र, सोशल मीडियावर सनी लिऑनीच्या नावाचं एक ऍडमिट कार्ड व्हायरल झालंय. हे प्रवेशपत्र अभिनेत्री सनी लिऑनीच्या नावाने जारी करण्यात आलंय. त्यात अभिनेत्रीची दोन फोटो देखील आहेत.

सनी लिऑनीच्या नावाने जारी करण्यात आलेलं प्रवेशपत्र पाहून युपी पोलीस अधिकाऱ्यांना देखील धक्का बसलाय. ही माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरूवात केल्याची माहिती समोर येती आहे. प्रवेशपत्रानुसार सनी लिऑनीला तिरवा येथील श्रीमती सोनश्री मेमोरियल गर्ल्स कॉलेजमध्ये परिक्षेला बसायचं होतं. मात्र, कोणीतरी फेक प्रवेशपत्र दाखल करून युपी पोलिसांची थट्टा केली, अशी चर्चा सुरू झालीये.

दरम्यान, उमेदवारांच्या यादीतील या उमेदवाराची माहिती ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कॉलेजला कळताच त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर कॉलेजच्या बाहेर सनी लिऑनीला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी देखील केल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थानी दिली आहे. 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी होणारी कॉन्स्टेबल भरती परीक्षा 2 शिफ्टमध्ये घेतली जात आहे. पहिली शिफ्ट सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 03 ते 05 पर्यंत असते. त्यामुळे मॅनेजमेंटमध्ये देखील गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय.