भाडिपा फेम सारंग साठ्येने 12 वर्षांनतर केला 'हा' बदल

अनेक कलाकार सिनेमांसाठी सतत लूकमध्ये बदल करत असतात. काही जण वजन कमी करतात तर काही वजन वाढवतात. असाच बदल एका अभिनेत्याने आपल्या चेहऱ्यात केला आहे. पण हा बदल त्याने तब्बल 12 वर्षानंतर केला आहे. भाडिपामुळे प्रकाशझोतात आलेला सारंग साठ्ये आता प्रेक्षकांसमोर अभिनेता म्हणून लवकरच येणार आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 26, 2018, 08:51 PM IST
भाडिपा फेम सारंग साठ्येने 12 वर्षांनतर केला 'हा' बदल title=

मुंबई : अनेक कलाकार सिनेमांसाठी सतत लूकमध्ये बदल करत असतात. काही जण वजन कमी करतात तर काही वजन वाढवतात. असाच बदल एका अभिनेत्याने आपल्या चेहऱ्यात केला आहे. पण हा बदल त्याने तब्बल 12 वर्षानंतर केला आहे. भाडिपामुळे प्रकाशझोतात आलेला सारंग साठ्ये आता प्रेक्षकांसमोर अभिनेता म्हणून लवकरच येणार आहे. 

12 वर्षानंतर बदलला लूक 

सारंग नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येतोय. त्यासाठी त्यानं तब्बल बारा वर्षांनंतर आपली दाढी काढली आहे. 'हायजॅक' या हिंदी विनोदी चित्रपटात तो प्रथमच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सारंगनं आजवर लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. पण विनोदी अभिनेता म्हणून पहिल्यांदाच कामही करणार आहे. चित्रपटामध्ये तो एका हायजॅकरच्या विनोदी भूमिकेत दिसणार आहे.

आई - वडिलांनी देखील ओळखलं नाही 

सारंगने स्वत:ला जेव्हा आरशात पाहिलं तेव्हा त्याला स्वत:लाही चटकन ओळखता आलं नव्हतं. 'पहिल्यांदा दाढी काढल्यानंतर कोणीच मला ओळखलं नव्हतं. माझ्या आई-बाबांनीही मला ओळखलं नाही. चित्रपटाच्या शूटिंगसाठी एक महिना दिल्लीला होतो', असं त्यानं सांगितलं.