MUMBAI CONCERT : बॉलिवूड पदार्पणाआधीच सचिन तेंडूलकरची मुलगी अडचणीत, पोलिसांपर्यंत पोहोचलं प्रकरण

लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Updated: Dec 13, 2021, 01:30 PM IST
  MUMBAI CONCERT : बॉलिवूड पदार्पणाआधीच सचिन तेंडूलकरची मुलगी अडचणीत, पोलिसांपर्यंत पोहोचलं प्रकरण title=

मुंबई : मुंबईतील ग्रॅण्ड ह्यात या हॉटेलमध्ये कोरोनाचे नियमांची पायमल्ली केल्याचं दिसून येत आहे. नुकताच या हॉटेलमध्ये लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. पण येथे कोरोना नियम उल्लंघन झाल्याचं दिसून आलं.

या इव्हेंटमध्ये तरुणाई कॅनेडियन रॅपर एबी ढिल्लोनच्या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण या पार्टीत काही मोठे चेहरे ही दिसून आल्याने एकच चर्चा रंगते आहे.  बॉलिवूडची स्टार मंडळी देखील कोरोनाचे नियम झुगारत पार्टी करताना दिसले. या कार्यक्रमात अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टन्सिंगची देखील ऐशीतैशी करण्यात आली.

दरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्याने या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्यात आली आहे. लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री सारा अली खान, तिचा भाऊ इब्राहिम अली खान, जान्हवी कपूर, सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही मंडळी हजर होती. त्यांना कॅमेऱ्यानं कैद केलं आहे.

ही प्रकरण सध्या पोलिसात पोहोचलं आहे. आयोजकांवर मुंबई पोलिसांनी FIR दाखल केली आहे. सारा तेंडुलकरचा देखील या पार्टीतील व्हिडिओ व्हायरल होत आहे. सचिन तेंडुलकरची लेक साराने नुकतच मॉडेलिंग विश्वात पदार्पण केलं आहे. त्यानंतर लवकरच ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याचं बोललं जात आहे.