...म्हणून निक जोनास प्रियांकाला रात्रभर झोपू देत नाही, अभिनेत्रीने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Updated: Jul 19, 2022, 08:50 PM IST
...म्हणून निक जोनास प्रियांकाला रात्रभर झोपू देत नाही, अभिनेत्रीने केला खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकी सिंगर निक जोनसशी लग्न केले. त्या दोघांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते दोघे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. बऱ्याचवेळा हे दोघे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहतात. एका मुलाखतीत प्रियांकाने तिचे बेडरुम सिक्रेट सांगितले आहे. 
 
प्रियांकाने मुलाखतीत सांगितले होते की, लग्नानंतर तिला अनेक तास झोप येत नाही, याचे कारण दुसरे कोणी नसून तिचा पती निक आहे. खरंतर निकला मधुमेह आहे. निकला आता नाही तर अनेक दिवसांपासून मधुमेहाने त्रस्त आहे. यामुळे निकला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत निकची शुगर किती आहे हे रात्रीच्या वेळीही तपासतो. त्यामुळे प्रियांकालाही सर्व काही ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी रात्री जागी राहते. यावरून प्रियांका निकवर किती प्रेम करते याचा अंदाज येऊ शकतो.

१ डिसेंबर २०१८ रोजी प्रियांकाने जोधपूरच्या उम्मेद पॅलेसमध्ये हिंदू आणि नंतर ख्रिश्चन परंपरेनुसार निकशी लग्न केले. लग्नाआधी दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. लग्नानंतर प्रियांका पतीसोबत अमेरिकेत राहते. तर त्यांना एक मुलगी असून मलाती मेरी चोप्रा जोनस असे आहे.