...म्हणून श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास चमकीला यांनी दिला होता नकार!

Amar Singh Chamkila- Sridevi : अमर सिंग चमकीला यांनी श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास का दिला होता नकार... मित्रानं केला खुलासा

दिक्षा पाटील | Updated: Apr 13, 2024, 01:36 PM IST
...म्हणून श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास चमकीला यांनी दिला होता नकार!  title=
(Photo Credit : Social Media)

Amar Singh Chamkila- Sridevi : लोकप्रिय पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझ आणि परिणीति चोप्रा यांचा 'चमकीला' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. इम्तियाज अली यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात पंबाजी गायक अमर सिंग चमकीला यांचं आयुष्य दाखवण्यात आलं आहे. या सगळ्यात आता चमकीला यांचे मित्र दोस्त स्वर्ण सिविया यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात त्यांनी दावा केला होता की अभिनेत्री श्रीदेवी यांना अमर सिंग चमकीला यांच्यासोबत काम करायचं होतं, पण अमर सिंह चमकीला यांनी श्रीदेवीसोबत काम केलं नाही. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चमकीला यांचे मित्र स्वर्ण सिविया म्हणाले की "श्रीदेवी अमर सिंग चमकीला यांची चाहती होती. त्यांनी चमकीला यांना त्यांच्या चित्रपटात हिरोची भूमिका साकारण्याची ऑफर दिली होती. पण चमकीला यांनी सांगितलं की त्यांना हिंदीत बोलता येत नाही. श्रीदेवी यांनी त्यानंतर चमकीला यांना एक महिन्याची ट्रेनिंग देण्यात येईल अशी देखील ऑफर दिली, चमकीला यांनी श्रीदेवी यांना सांगितलं की मला 10 लाख रुपयांचं नुकसान होईल. त्यानंतर श्रीदेवी यांना चमकीला यांच्यासोबत पंजाबीमध्ये एक चित्रपट करायचा होता, त्यासाठी देखील त्या तयार झाल्या. पण असं होऊ शकलं नाही."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लक्षवेधी गोष्ट ही आहे की अमर सिंग चमकीला पंजाबी लोकगीत आणि एक उत्तर स्टेज परफॉर्मरसाठी ओळखले जात होते. ते त्यांची गाणी स्वत: लिहायचे आणि त्यांचं स्वत: चं एक ब्रॅंड देखील होतं. या सगळ्यात त्यांची पत्नी अमरजोत सिंग चमकीला देखील असायच्या. त्यांच्यासोबत ते गाणी गायचे आणि तुम्बी देखील वाजवायचे. चमकीला यांच्याविषयी बोलायचे झाले तर 80 च्या दशकात चमकीला पंजाबी म्यूजिकचे सगळ्यात लोकप्रिय गायक होते. त्यावेळी त्यांचे सगळ्यात जास्त कॅसेट आणि रेकॉर्ड त्यांचेच असायचे. 1988 मध्ये फक्त वयाच्या 27 व्या वर्षी चमकीला यांची हत्या करण्यात आली. 

हेही वाचा : 'झलक दिखला जा' विजेती असलेल्या अभिनेत्रीवर आली चहा विकण्याची वेळ!

त्यांचे चाहते फक्त भारतात नव्हते तर परदेशात देखील असायचे. त्यांच्या लोकप्रिय ठरलेल्या गाण्यांमध्ये 'ललकारे नाल' आणि काही धार्मिक गाणी देखील आहेत त्यात 'बाबा तेरा ननकाना', 'तलवार मैं कलगीधार दी' अशी गाणी आहेत. आजही लोकांनी ती गाणी ऐकायला आवडतात.