अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाच्या ठिकाणाचा पहिला व्हिडिओ समोर

बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल 23 जानेवारी रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 

Updated: Jan 22, 2023, 06:25 PM IST
अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाच्या ठिकाणाचा पहिला व्हिडिओ समोर  title=

मुंबई : सध्या बॉलीवुडमध्ये लग्नसराईचा मौसम सुरू आहे. या मौसमात क्रिकेटपटू के एल राहुल (KL Rahul) आणि अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) याचं लग्न होणार असून तीन दिवस हा लग्नसोहळा होईल. मीडिया रिपोर्टनुसार या दोघांचं लग्न 23 जानेवारी रोजी होणार आहे. यांच्या दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असून के एल राहुलचे घर सुंदर दिव्यांनी सजवण्यात आलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल 23 जानेवारी रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. आता या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाआधीचे सेलिब्रेशन सुरू झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी, खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसवरील सजावटीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाचं ठिकाण असल्याचं म्हटलं जातं. बऱ्याच दिवसांपासून अथिया शेट्टीचं लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर होणार असल्याची चर्चा होती.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी 2019 मध्ये डेटिंग सुरू केलं आणि ते अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडिया शेअर करतात. असं सांगितलं जात आहे की, लग्नाचे ठिकाण खूप सुंदर आहे, कारण सुनील शेट्टीने एकदा एशियन पेंट्स व्हेअर द हार्ट इज सीझन 5 च्या एपिसोडमध्ये त्याचं खंडाळा फार्म हाऊस दाखवलं होतं. 22 जानेवारीला म्हणजेच आज मेहंदी सोहळा होणार आहे. हा कार्यक्रम घरामध्ये केला जाईल.

23 जानेवारीला अथिया आणि राहुल केवळ 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधतील. सर्व पाहुण्यांना फोटो पोस्ट न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसंच त्यांना त्यांचे फोन दूर ठेवायला सांगण्यात आलं आहे. जातील.  सूत्रांनुसार अथिया आणि राहुल बॉलीवूड व्यतिरिक्त क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

21 तारखेपासून या जोडप्याचे पाहुणे यायला सुरुवात झाली आहे.  सुंत्रानूसार केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची हळदी,  मेहंदी, संगीत आणि बहुप्रतिक्षित डी-डे सारख्या सर्व कार्यक्रमांसह एक मोठा दक्षिण भारतीय विवाह होणार आहे.