Baipan Bhari Deva Vandana Gupte: सध्या 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट सर्वत्र गाजतो आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घालतो आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे या चित्रपटातून काम केलेल्या अभिनेत्रींची. वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगणी, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी, सुकन्या मोने आणि शिल्पा नवलकर यांच्या भुमिका यावेळी तूफान गाजत आहेत. यावेळी या चित्रपटात त्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यामध्ये सर्वांचीच चर्चा आहे परंतु सध्या वंदना गुप्ते यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपला एक अनुभव शेअर केला आहे. ही कथा बहिणींची आहे आणि खासकरून प्रत्येक स्त्रीची आहे.
‘लेट्अप मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी मुलाखतीदरम्यान त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. लहानपणी आपण आपल्या आईकडून व्यवहारज्ञान कसे जोपासलेत याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या की, ''माझी आई गाण्याचे कार्यक्रम करायची. त्यामधून तिला जास्तीत जास्त हजार ते २ हजार रुपये मानधन मिळायचे. अर्थात, ती रक्कम फार जास्त नव्हती. पण, त्यातून माझी आई शंभर, दोनशे रुपये बाजूला काढून साठवायची.''
हेही वाचा - Video: शेवटी आईच ती! 42 दिवसांपासून दूर राहिलेल्या गायिकानं दौऱ्याहून परत येताच लेकाला मारली कडकडून मिठी
''या शंभर रुपयांच्या नोटा माझी आई प्रत्येक साडीच्या घडीत ठेवून द्यायची. हेच पैसे नंतर एकत्र गोळा करून जवळपास 10 ते 12 हजार जमले होते. या पैशांतून तेव्हा आम्ही नवे घर घेतले. तिथे माझे आणि माझ्या भावंडांचे बालपण गेले. अर्थात तेव्हा 12 हजार रुपये खूप जास्त होते. तो काळ खूप वेगळा होता. पण, माझ्या आईचे यासाठी खरंच कौतुक आहे कारण, साड्यांच्या घड्यांमध्ये पैसे साठवलेले असतील याचा अंदाज कोणालाच येणार नाही.”
सध्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे यावेळी या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. पहिल्या आठवड्यात 6 कोटींहून अधिक कमाई या चित्रपटानं केली आहे. सोबतच दुसऱ्या आठवड्यात 12 कोटींहून अधिक कमाई करत आत्तापर्यंत या चित्रपटानं 26 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट फारच गाजतो आहे. अशाच आता चर्चा आहे ती म्हणजे या चित्रपटाला मिळणाऱ्या उत्सुफर्त प्रतिसादाची.