नवी दिल्ली : बॉलिवूडची ऑल टाईम फेव्हरेट अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालं. त्यांच्या निधनाने अवघ्या बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरली. श्रीदेवी यांच्या निधनानंतर सर्वांनीच दु:ख व्यक्त केलयं.
श्रीदेवी यांनी अकाली घेतलेली एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बॉलिवूडसोबतच देशभरातील तमाम चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली.
श्रीदेवी यांच्या निधनानंतर बाहुबली सिनेमाच्या टीमनेही श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता प्रभास, अभिनेत्री तमन्ना भाटिया, राणा दग्गुबती, राजा मौली आणि अनुष्का शेट्टी या सर्वांनी शोक व्यक्त करत ट्विट्स केले आहेत.
There's nothing more heartbreaking than losing someone you look up to tremendously. Sridevi was the magic that made us believe in the beauty of cinema. Still can't believe she's no more. Darkest day for cinema. RIP #Sridevi pic.twitter.com/xuFwS9iq1B
— Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) February 25, 2018
Form a Child Artist to a Legendary Movie Star!! A great journey of one of the most charismatic women in the world of cinema comes to an end. #RIPSridevi pic.twitter.com/WWayQXKtpR
— Rana Daggubati (@RanaDaggubati) February 25, 2018
Shocked to hear the sad news. The first Lady Superstar of the Country. 50 of those 54 years as an actress par excellence. What a journey..and such an unexpected end. May your soul rest in peace.
Sridevi garu— rajamouli ss (@ssrajamouli) February 25, 2018
बाहुबली सिनेमा हिट झाल्यानंतर या सिनेमासोबत श्रीदेवी यांचं नाव जोडलं गेलं होतं. मीडिया रिपोट्सनुसार, या सिनेमाच्या सिक्वलमध्ये शिवगामीच्या भूमिकेसाठी राजा मौली यांनी श्रीदेवी यांना विचारणा केली होती. मात्र, श्रीदेवी यांचं मानधन अधिक असल्याने राजामौली यानी रम्या यांना विचारणा केली. ही माहिती स्वत: राजमौली यांनी दिली होती. नंतर राजामौली यांनी माफी मागत म्हटलं की, अशा प्रकारे सर्वांसमोर ही माहिती उघड करायला नको होती.
बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाह याच्या विवाहासाठी श्रीदेवी संपूर्ण कुटुंबियांसोबत दुबईमध्ये उपस्थित होत्या. त्याच दरम्यान कार्डिएक अरेस्टमुळे अचानक अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं.