'साहो'चा दुसरा पोस्टर रिलीज, वाढदिवसादिवशी चाहत्यांना देणार खास गिफ्ट

पाहा पोस्टर 

'साहो'चा दुसरा पोस्टर रिलीज, वाढदिवसादिवशी चाहत्यांना देणार खास गिफ्ट  title=

मुंबई : प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा अपकमिंग सिनेमा 'साहो'चा दुसरा पोस्टर रिलीज झाला आहे. पोस्टरमध्ये प्रभास आपल्या शानदार स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर प्रभासच्या या लूकला खूप पसंत केलं जातं आहे. 

तसेच निर्मात्यांनी या सिनेमाचा 'शेड्स ऑफ साहो' नावाचा एक व्हिडिओ देखील रिलीज केला आहे. या अंतर्गत सिनेमा मेकिंग आणि बॅकग्राऊंड फुटेज दर्शकांसमोर आणलं आहे. याचा पहिला व्हिडिओ प्रभासच्या वाढदिवशी म्हणजे 23 ऑक्टोबर रोजी रिलीज केला आहे. 

तसेच प्रभासच्या 38 व्या वाढदिवसादिवशी या सिनेमाचा फर्स्ट लूक देखील जाहीर केला आहे. ज्यामध्ये तो खूप वेगळ्या अंदाजाक दिसत आहे. साहो हा एक अॅडवेंचर फँटसी सिनेमा आहे. श्रद्धा या सिनेमातून तेलगू सिनेमात आपला डेब्यू करत आहे. 

150 करोड रुपये बजेट असलेल्या या सिनेमात प्रभास बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लीड रोलमध्ये दिसणार आहे. साहो हा सिनेमा तेलगुप्रमाणेच हिंदी भाषेत देखील रिलीज होणार आहे. अॅक्शनने भरलेल्या या सिनेमात नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे आणि मंदिरा बेदी हे कलाकार आहेत.