प्रभासच्या आयुष्याबद्दल भविष्यवाणी करणाऱ्या ज्योतिषांची 'ती' गोष्ट खरी झाली तर...

'बाहुबली' फेम प्रभासच्या खासगी आयुष्याबद्दल प्रसिद्ध ज्योतिषांकडून महत्त्वाची भविष्यवाणी, चाहत्यांना बसेल मोठा धक्का...  

Updated: Mar 5, 2022, 08:57 AM IST
 प्रभासच्या आयुष्याबद्दल भविष्यवाणी करणाऱ्या ज्योतिषांची 'ती' गोष्ट खरी झाली तर... title=

मुंबई : कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहात आहेत. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकाराच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. एवढंच नाही तर सेलिब्रिटींच्या रंगलेल्या अफेअर्सच्या चर्चांनंतर चाहते त्यांना लग्न कधी करणार असा प्रश्न कायम विचारत असतात. आता सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे 'बाहुबली' फेम प्रभासच्या लग्नाची. 

प्रभासचा 'राधे श्याम' सिनेमा लवकरचं प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमा प्रदर्शनापूर्वी त्यांच्या लग्नाबद्दल केलेल्या भविष्यवाणीची चर्चा तुफान रंगत आहे. प्रभास लवकरचं लग्न बंधनात अडणार असल्याची भविष्यवाणी ज्योतिषी आचार्य विनोद कुमार यांनी केली आहे. 

बाहुबली प्रभास अडकणार विवाह बंधनात, कोणासोबत करणार लग्न?

आचार्य विनोद यांनी केलेल्या केलेल्या भविष्यवाणीत म्हटलं आहे की, 'राधेश्याम सिनेमात विक्रमादित्य भूमिका साकारणार प्रभास लवकरचं लग्न बंधनात अडकणार आहे...' त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली तर, प्रभास लवकरचं विवाह बंधनात अडकेल. 

प्रभासबद्दल केलेल्या भविष्यवाणीमुळे त्याचे चाहते प्रचंड आनंदी आहेत. 'राधेश्याम' सिनेमात प्रभास शिवाय अभिनेत्री पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताचं सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 

राधा कृष्णद्वारा दिग्दर्शित आणि कोटागिरी वेंकटेश्वर निर्मित 'राधेश्याम' सिनेमा 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र त्याच्या आगामा सिनेमा आणि लग्नाची चर्चा  रंगत आहे. 

सिनेमा तर 11 मार्च रोजी प्रदर्शिच होईल पण प्रभास कधी लग्न बंधनात अडकेल? याबद्दल अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.