Love Story : प्रेमात असणाऱ्या दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांसोबत साता जन्माच्या आणाभाका घेतात, तेव्हा त्या व्यक्तींपुढे सारं जग ठेंगणं असतं. कारण ते एकमेकांच्याच विश्वात रममाण झालेले असतात. पण, प्रत्येकवेळी हे प्रेमाचं नातं यशस्वी टप्प्यावर पोहोचेलच असं नाही. मग, एकमेकांसोबत घालवलेला वेळ आठवतच जीवनातील पुढची वाटचाल करण्याचा निर्णय अनेकजण घेतात. एका अतिशय गाजलेल्या चित्रपटातील अभिनेत्रीसोबतही काहीसं असंच झालं.
'बाहुबली' (bahubali) फेम अभिनेता प्रभासच्या (Prabhas) प्रेमात आकंठ बुडालेली आणि त्याच्यासाठी ठरलेलं लग्न मोडणारी ही अभिनेत्री म्हणजे अनुष्का शेट्टी (Anushka shetty). दाक्षिणात्य कलाजगतामध्ये प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या अनुष्कानं SS Rajamouli यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या Bahubali मध्येही प्रभाससोबत स्क्रीन शेअर केली होती. (bahubali fame Anushka Shettys marriage broke because of Actor prabhas read about her Love Life)
रुपेरी पडद्यावरच नव्हे, तर प्रत्यक्ष आयुष्यातही अनुष्कानं प्रभासच्या आयुष्यात घर केलं होतं. इतकं, की त्याच्यासाठी आणि चित्रपटासाठी तिनं ठरलेलं लग्नही मोडलं. पण, बहुतांश ठिकाणी तिनं करिअरसाठी खासगी आयुष्याला दूर लोटल्याचं म्हटलं गेतं. राजामौलींच्या बाहुबली चित्रपटादरम्यान प्रभास आणि अनुष्का या दोघांमध्ये जवळीक वाढत असल्याची वृत्त समोर आली. पण, त्या दोघांनी कधीच नात्याचा स्वीकार केला नाही.
अनुष्कानंही चित्रपटासाठी तितकंच समर्पण दाखवावं जितकं इतर कलाकार दाखवत आहेत अशा धारणेनं प्रभासच्या सांगण्यावरून तिचं लग्न मोडल्याचं म्हटलं जातं. यात प्रेमाखातर लग्न मोडण्याचे संदर्भ फारच क्वचित मिळतात, अगदी नसल्यात जमा. पण, जेव्हाजेव्हा अनुष्काच्या लग्नाचा विषय निघतो, तेव्हातेव्हा प्रभासमुळंच तिचं लग्न मोडल्याचं म्हटलं गेलं. सध्याच्या घडीला अनुष्का Single असल्याचं म्हटलं जात आहे.
तिथे अनुष्काशी असणारं प्रभासचं नातं चर्चांपासूनही दूर झालेलं असतानाच अभिनेत्याचं लग्न ठरल्याच्याही चर्चा रंगल्या. किंबहुना त्या चर्चाही शमल्या. आता तर म्हणे प्रभास अभिनेत्री क्रिती सेननला (prabhas Kriti sanon date) डेट करत आहे. आता हे कितपत खरं हे मात्र सांगता येणं कठीण आहे. कारण, प्रभास आणि क्रिती सेनन येत्या काळात आगामी चित्रपटातून एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे हा Publicity stunt असू शकतो ही बाबही नाकारता येत नाही.