Alia Bhatt Ranbir Kapoor Baby: आलिया-रणबीर चिमुकलीला लाड करतानाचा फोटो पाहिला का?

Viral Photo : आलिया-रणबीरची सोनपरी (Alia Bhatt Ranbir Kapoor Baby) कशी दिसते हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक आहे. अशातच चिमुकलीसोबत खेळतानाचा आलिया आणि रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

Updated: Nov 8, 2022, 02:06 PM IST

Alia_Ranbir_Baby_Photo

Alia Bhatt Ranbir Kapoor Baby First Photo : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी गोंडस परीचं आगमन झालं आहे. त्यानंतर भट्ट आणि कपूर कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. 6 नोव्हेंबरला आलियाला कन्यारत्न झाल्यावर सोशल मीडियावर त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. आलिया-रणबीरच्या चाहत्यांमध्ये आता कपूर कुटुंबाच्या परीची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुकता आहे. अगदी नीतू सिंग हॉस्पिटलमधून घरी परत असताना पापाराझींनी त्यांना विचारलं की बाळ कोणासारखं दिसतं ते? 

आलियाची सोनपरी

आलिया-रणबीरची सोनपरी कशी दिसते हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक आहे. अशातच चिमुकलीसोबत खेळतानाचा आलिया आणि रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या फोटो मध्ये आलिया लहान बाळाला प्रेम करताना दिसतं आहे. (Alia Bhatt Ranbir Kapoor Baby First Photo Viral on social media nmp)

रणबीरची लाडली

आलिया शिवाय रणबीर पण एका लहान चिमुकलीला गोदीत घेऊन प्रेम करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये रणबीरने ब्लॅक कलरचा कुर्ता आणि लहान मुलीने ब्लू कलरचे कपडे घातले आहेत. 

Alia Bhatt Ranbir Kapoor Baby Photo Fact Check :

जर तुम्हाला वाटतं असेल तर हे आलिया-रणबीरचं बाळ आहे तर तसं नाही आहे. हे फोटो फार जुने असून ते पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल  होतं आहे. आलिया-रणबीरला बाळ झाल्यानंतर सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

त्याचबरोबर काही फॅन पेजवर आलिया आणि रणबीरचे कॉम्प्युटराइज्ड फोटोही दिसत आहेत.  आलिया भट्टचे लहानपणीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.