'पार्लर वाली है?' आयुष्यमान खुरानासोबत दिसलेल्या Andrea Kevichusa ची कुंडली का शोधताहेत सगळे?

ही आहे तरी कोण? हा प्रश्न डोक्यात घर करुन जातो.   

Updated: May 5, 2022, 03:52 PM IST
'पार्लर वाली है?' आयुष्यमान खुरानासोबत दिसलेल्या Andrea Kevichusa ची कुंडली का शोधताहेत सगळे? title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : हिंदी चित्रपटांच्या दुनियेत सध्या काही नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. असाच एक चेहरा काही क्षणांपूर्वीच प्रेक्षकांसमोर आला आणि ही आहे तरी कोण? हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. अभिनेता आयुष्मान खुरानाच्या 'अनेक' (Anek) या आगामी चित्रपटातून त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणारी ही अभिनेत्री आहे (Andrea Kevichusa) एंड्रिया केविचुसा. 

पार्लर वाली है क्या... ? हा डायलॉग चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये येतो आणि तिच्या सणसणीत चपराक दिल्याचं आपण पाहतो. त्याच क्षणी, ही आहे तरी कोण? हा प्रश्न डोक्यात घर करुन जातो. 

Anek च्या ट्रेलरमध्ये दिसणारी ही अभिनेत्री मुळची नागालँडची असल्याचं सांगण्यात येत आहे. ती एक प्रसिद्ध मॉडेल असून, या क्षेत्रात बरीच सक्रिय आहे. सब्यसाची मुखर्जीपासून Piaf या सेलिब्रिटी डिझायनर्ससोबतही तिनं काम केलं आहे. 

एंड्रियानं कतरिनाच्या एका कॉस्मॅटिक ब्रँडसाठीही शूट केलं आहे. मुंबईतील एका Animal Creatives नावाच्या संस्थेसोबत ती काम करते. तिथंच तिला मुकेश छाबडा यांनी पाहिलं आणि या चित्रपटासाठी तिचं ऑडिशन घेतलं. 

वयाच्या 15 व्या वर्षापासून मॉडेलिंग या क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या एंड्रिया हिनं शिक्षणासोबतच या क्षेत्रातही तिची कारकिर्द सुरुच ठेवली. आता तिनं चित्रपटांच्या विश्वात पदार्पण केलं आहे. तेव्हा आता अभिनयाच्या बळावर ती किती मोठी होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.