प्रसिद्ध सिंगर जुबिन नौटियालच्या अटकेची मागणी का होतेय? जाणून घ्या

जुबिन नौटियालच्या अडचणीत वाढ, नेमकं असं काय कृत्य केलंय, ज्यामुळे त्याच्या अटकेची मागणी होतेय? 

Updated: Sep 9, 2022, 10:50 PM IST
  प्रसिद्ध सिंगर जुबिन नौटियालच्या अटकेची मागणी का होतेय? जाणून घ्या title=

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध सिंगर जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) याच्या अटकेची मागणी सोशल मीडियावर जोर धरतेय.  सोशल मीडियावर #ArrestJubinNautyal ट्रेड होत आहे. हे हॅशटॅश वापरून नेटकरी जुबिन नौटियालच्या अटकेची मागणी करतायत. त्यामुळे नेमकं अस जुबिन नौटियालने काय केलंय, ज्यामुळे त्याच्या अटकेची मागणी होतेय, ते जाणून घेऊयात. 

प्रसिद्ध सिंगर जुबिन नौटियालने (Jubin Nautiyal) बॉलिवूडसाठी एकापेक्षा एक हिट गाणी गायली आहेत. ज्यामध्ये 'दिल गल्ती कर बैठा है', 'तुम ही आना', 'लूट गए', 'बेवफा तेरा मसूर चेहरा', 'स्टार्सचे शहर' आणि 'राता लांबियाना' आणि इतर अनेक हिट गाणी त्याने गायली आहेत. ही गाणी गाऊन त्याने फॅन्सच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. मात्र हाच जुबिन नौटियाल एका नव्या अडचणीत सापडला आहे. 

कारण काय?
जुबिन नौटियालचा (Jubin Nautiyal)  कॉन्सर्ट लवकरच अमेरिकेत होणार आहे. पण कॉन्सर्टच्या काही दिवस आधीच तो अडचणीत सापडला आहे. जुबिनला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. जुबिनच्या कॉन्सर्टच्या आयोजकात सामील असलेल्या एका व्यक्तीचे नाव यामागचे कारण आहे.

का होतेय अटकेची मागणी?
जुबिन नौटियालचे (Jubin Nautiyal)  एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये 23 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जुबिनच्या आगामी कॉन्सर्टची माहिती लिहिली आहे. हे पोस्टर रेहान सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले की, 'माझा आवडता गायक ह्यूस्टनला येत आहे. खूप छान काम जयसिंग. तुमच्या अप्रतिम सादरीकरणाची वाट पाहत आहे. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये जय सिंह हे नाव आल्यामुळे जुबिन नौटियाल ट्रोल होत आहे.

कोण आहे जयसिंग?
चंदीगड पोलीस गेल्या ३० वर्षांपासून जयसिंगचा शोध घेत आहेत. जयसिंगवर व्हिडीओ पायरसी आणि ड्रग्ज तस्करीचा आरोप आहे. जय मुख्यतः पंजाबचा आहे पण आता तो अमेरिकेत राहतो. इतके गंभीर आरोप असणाऱ्या व्यक्तीच्या कार्यक्रमात जुबिन नौटियाल गात असल्याने त्याच्या अटकेची मागणी होत आहे. 

नेटकऱ्यांचे म्हणणे काय?
जुबिन नौटियालच्या (Jubin Nautiyal)  कॉन्सर्टमध्ये वॉन्टेड जयसिंगच्या सहभागामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तसेच #ArrestJubinNautyal देखील ट्रेंडमध्ये आहे. तसेच जुबिनचे हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करताना हृतिक रोशन नावाच्या युजरने लिहिले, 'हा आहे बॉलिवूडचा खरा चेहरा.' #ArestJubinNautyal, तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'माझा विश्वास बसत नाही की जय आणि रेहान झुबिनला पैसे देतात. अशा प्रकारे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर जुबिन नौटियालच्या अटकेची मोहिम सुरु केली आहे. या मोहीमेमुळे जुबिन नौटियालच्या अटकेची मागणी जोर धरतेय.